शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

बससेवेविना वस्त्रनगरीत सर्वसामान्यांची परवड

By admin | Updated: November 12, 2014 23:27 IST

वृद्ध, लहान मुले, महिलांचे हाल : पर्यावरणासाठी आणि सर्वांसाठी उपयोगी

राजाराम पाटील : इचलकरंजी ::सर्वसामान्यांबरोबर मध्यमवर्गीय, श्रीमंत वर्ग यांना परवडणारी, पर्यावरणासाठी महत्त्वाची, वृद्धांबरोबर लहान मुले आणि विशेषत: महिला वर्गासाठी अनन्यसाधारण उपयोगाची शहर बस वाहतूक सेवा वीस वर्षांपूर्वी बंद पडली. त्यानंतर वस्त्रोद्योगाच्या विकासाबरोबर वाढत्या व्यापामुळे शहराची लोकसंख्या दुप्पट होऊन तीन लाख झाली; पण चर्चेपलीकडे शहर बस वाहतुकीकडे लोकप्रतिनिधी किंवा प्रशासनाने गांभीर्याने पाहिलेच नाही.वस्त्रोद्योगासाठी व बाजारपेठेमुळे आणि माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षणामुळे आसपासच्या पन्नास-साठ खेडेगावांचा दैनंदिन संपर्क आहे. या गावांतील साठ-सत्तर हजार लोक दररोज ये-जा करीत असतात. सध्या असलेली एसटी बस वाहतूक तुटपुंजी असल्याने लोकांना वडाप आॅटोरिक्षाचा वापर करावा लागतो. आॅटोरिक्षामध्ये ‘वडाप’ नावाप्रमाणेच प्रवासी माणसांना कोंबून बसविले जाते. ६ आसनी रिक्षामधून १०-१२ माणसांचे वडाप होते. त्यामध्ये लहान मुले व स्त्रियांचे हाल होतात.वीस वर्षांपूर्वी एसटीने कबनूर ते यड्राव सूतगिरणी आणि आयको स्पिन (शिरदवाड) ते कोरोची अशा मार्गांवर काही वर्षे शहर वाहतूक सेवा चालविली. मात्र, तत्कालीन बस वाहतूक तोट्यात जाऊ लागल्याने वाहतुकीतील नुकसानीची रक्कम इचलकरंजी नगरपालिकेने द्यावी, अशी मागणी एसटीने केली आणि नुकसानीची रक्कम त्यावेळी पालिका देतही असे; पण नगरपालिकाच आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाल्याने नुकसानीची रक्कम देणे पालिकेने बंद केले. त्यानंतर एसटीने रडतखडत काही महिने शहर बससेवा चालविली आणि बंद केली. त्याला वीस वर्षे उलटली.या वीस वर्षांत इचलकरंजीतील वस्त्रोद्योगाचा विकास झाला. उद्योगधंद्यांच्या वाढत जाणाऱ्या व्यापाबरोबर लोकसंख्याही वाढली. शहरातील राहणीमान महाग असल्याने तुलनेने स्वस्त असलेल्या आसपासच्या २५ ते ३० खेडेगावांत कामगार-कष्टकरी-नोकरदार राहतात आणि तेथून दररोज येथे येतात आणि परत जातात. अशांची संख्या साठ-सत्तर हजार आहे. तर खुद्द इचलकरंजीची लोकसंख्या तीन लाख आहे. त्यापैकी बहुतांश कामगार वर्ग असल्याने त्यांना शहर वाहतूक सेवा परवडणारी आहे. त्यामुळे शहर बस वाहतूक सेवा सुरू करावी, अशी मागणी आहे. (समाप्त)आसपासच्या खेडेगावांतही वस्त्रोद्योगयेथील उद्योगधंद्यासाठी कामगार, नोकरदार दररोज इचलकरंजीत येतात. त्याप्रमाणे आसपासच्या कबनूर, रुई, तिळवणी, साजणी, चंदूर, जंगमवाडी, रांगोळी, रेंदाळ, माणकापूर, बोरगाव, लाट, शिरदवाड, शिवनाकवाडी, शिरढोण, टाकवडे, यड्राव, तारदाळ, खोतवाडी, कोरोची, हातकणंगले, आदी गावांमध्ये यंत्रमाग, सायझिंग व तत्सम उद्योगांचे कारखाने झाले आहेत. त्यांचीही दररोजची वाहतूक इचलकरंजीस असते.शहर बससेवेचे मार्ग१) मजले, तारदाळ, खोतवाडी, यड्राव (पार्वती इंडस्ट्रीयल इस्टेट)२) शिरढोण-टाकवडे.३) अब्दुललाट (लाटवाडी), शिरदवाड, शिवनाकवाडी (आयको स्पिन).४) हुपरी, रेंदाळ, जंगमवाडी, माणकापूर.५) पट्टणकोडोली, इंगळी, रुई, कबनूर.६) माणगाव, नवमहाराष्ट्र, साजणी, तिळवणी.७) हातकणंगले, हातकणंगले रेल्वे स्टेशन, कोरोची, गंगानगर.८) लक्ष्मी इंडस्ट्रीयल इस्टेट, तिळवणी, कबनूर.९) तारदाळ, शहापूर.१०) चंदूर, आभार फाटा-कलानगर.