शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
6
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
7
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
8
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
9
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
10
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
11
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
12
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
13
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
14
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
15
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
16
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
17
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
18
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

स्त्रीभ्रूण हत्या रोखाव्यात धाडी टाका : जिल्हाधिकारी यांचे आरोग्य विभागाला आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 1:01 AM

कोल्हापूर : स्त्रीभ्रूण हत्या हा समाजाला लागलेला कलंक असून, त्या रोखण्यासाठी आरोग्य विभागाने अचानक धाडी टाकण्याची मोहीम तीव्र करावी, ...

कोल्हापूर : स्त्रीभ्रूण हत्या हा समाजाला लागलेला कलंक असून, त्या रोखण्यासाठी आरोग्य विभागाने अचानक धाडी टाकण्याची मोहीम तीव्र करावी, असे आदेश जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी मंगळवारी येथे दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय ‘पीसीपीएनडीटी’ दक्षता पथक समितीची बैठक आयोजित केली होती. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील, जि. प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ, जिल्हा परिषदेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. फारूक देसाई, ‘पीसीपीएनडीटी’ कायदा सल्लागार गौरी पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विलास देशमुख, सेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कदम, आदी प्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, सध्या जिल्ह्यात ० ते ६ वयोगटातील १ हजार मुलांच्या जन्माच्या तुलनेत मुलींच्या जन्माचे प्रमाण ९३३ आहे. हे प्रमाण वाढणे गरजेचे आहे. यासाठी आरोग्य विभागाने जिल्ह्यात एकही स्त्रीभ्रूण हत्या होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या १५० सोनोग्राफी सेंटर्समध्ये १३२ अल्ट्रासोनोग्राफी सेंटर्स, १० कार्डीआॅलॉजिस्ट सेंटर्स, ६ सर्जिकल सेंटर्स आणि २ एमआरआय सेंटर्सचा समावेश आहे. त्यांच्या माध्यमातून ‘पीसीपीएनडीटी’ अ‍ॅक्टनुसार कार्यवाही होणे बंधनकारक असून, यामध्ये हयगय करणाऱ्या सेंटर्सवर तत्काळ कार्यवाही करावी....अन्‘स्त्रीभ्रूण’ हत्या टाळास्त्रीभ्रूण हत्या होत असल्याचे समजल्यास 18002334475 या टोल फ्री क्रमांकावर, तसेच नजीकच्या शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाºयांशी संपर्क साधावा. माहिती देणाºयाचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे केम्पी पाटील यांनी सांगितले.

‘नोंदणीकृत’ केंद्रांवरही नजर ठेवाजिल्ह्यात १५३ नोंदणीकृत वैद्यकीय गर्भपात केंद्रे असून यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राकडील ७२, ग्रामीण रुग्णालयांची २०, तर ६१ खासगी वैद्यकीय गर्भपात केंद्रांचा समावेश आहे. या केंद्राच्या कामकाजावरही करडी नजर ठेवावी, अशा सूचना जिल्हाधिकाºयांनी दिल्या.

कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी आयोजित ‘पीसीपीएनडीटी’ दक्षता पथक समिती बैठकीत जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी आढावा घेतला. यावेळी आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीhospitalहॉस्पिटल