शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

अजून शेणीच.. कोल्हापुरातील अंत्यसंस्काराच्या पारंपरिक पद्धतीबाबत अजित पवारांना कुतूहल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 18:05 IST

प्रा. पाटील यांचे पार्थिव चितेवर ठेवून त्यामध्ये कापूर घालण्यात आला. त्यावर विस्तव ठेवण्यात आला. मंत्री पवार यांना तेवढ्याने कसा अग्नी लागणार याबद्दल उत्सुकता होती. त्याला बाहेरून भडाग्नी का देत नाही, अशी विचारणा ते तेथील कर्मचाऱ्यांना करत होते.

कोल्हापूर : कोल्हापुरात अजून शेणी वापरूनच अंत्यसंस्कार होतात, येथे विद्युतदाहिनी का नाही अशी विचारणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी येथे केली. ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्यावर येथील कसबा बावडा परिसरातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यासाठी उपमुख्यमंत्री पवार हे उपस्थित होते. कुठे जाईल तेथील पध्दती, व्यवहार आणि प्रश्न समजून घेण्याची पवार कुटुंबीयांची सवय आहे. त्यास अनुसरून पवार यांनी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राजू लाटकर यांच्याकडून कोल्हापुरातील अंत्यसंस्काराच्या स्थितीची माहिती घेतली.

प्रा. पाटील यांचे पार्थिव चितेवर ठेवून त्यामध्ये कापूर घालण्यात आला. त्यावर विस्तव ठेवण्यात आला. मंत्री पवार यांना तेवढ्याने कसा अग्नी लागणार याबद्दल उत्सुकता होती. त्याला बाहेरून भडाग्नी का देत नाही, अशी विचारणा ते तेथील कर्मचाऱ्यांना करत होते. कोल्हापुरात अशीच पध्दत असून वारे लागले की चितेला अग्नी लागेल असे स्मशानभूमीतील कर्मचाऱ्याने सांगितले. शेजारीच लाटकर उभे होते. त्यांच्याकडे त्यांनी अजून शेणी वापरूनच का अंत्यसंस्कार करत असल्याची विचारणा केली.कोल्हापुरात चार स्मशानभूमी आहेत. परंतु सगळीकडे याच पारंपरिक पध्दतीने अंत्यसंस्कार केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी महापालिका शेणी व लाकूड मोफत उपलब्ध करून देत असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यावर त्यांनी जगभरात विद्युतदाहिनीचा वापर केला जात असताना कोल्हापुरात मात्र अजूनही शेणीच का वापरतात अशी विचारणा केली. कोल्हापुरात डिझेल दाहिनीचीही सोय आहे. परंतु फक्त कोरोनाच्या काळातच तिचा वापर झाला. त्यानंतर तिथे अंत्यसंस्कार होत नाहीत.मृत्यूनंतरही आपल्या जवळच्या व्यक्तीस विजेचे चटके बसू नयेत अशी मानसिकता स्थानिक लोकांची आहे. त्यामुळे येथे डिझेल किंवा विद्युतदाहिनीच लोक स्वीकारत नसल्याचे पत्रकारांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले. प्रा. पाटील यांच्या चितेस पूर्ण अग्नी लागल्याची खात्री झाल्यावरच उपमुख्यमंत्री पवार स्मशानभूमीतून बाहेर पडले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरN D Patilप्रा. एन. डी. पाटीलAjit Pawarअजित पवार