शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

Navratri2022: अंबाबाईच्या दर्शनासाठी इतिहासात पहिल्यांदा उच्चांकी गर्दी, आठ लाख भाविकांची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2022 13:37 IST

एवढे दिवस भवानी मंडपातच रांगा फिरविल्या जायच्या, पण रविवारी भाऊसिंगजी रोड आणि शिवाजी पुतळ्यापर्यंत तीन चार रांगा लागल्या होता.

कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सव आणि रविवारचा योग साधत अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी मंदिराच्या इतिहासात पहिल्यांदा उच्चांकी गर्दीचा विक्रम गेला. रविवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ७ लाख ७२ हजार ७२१ इतक्या भाविकांची नोंद झाली. पहाटे २ वाजल्यापासून मुख्य दर्शन रांग लागायला सुरुवात झाली आणि ८ वाजताच या रांगा मध्यवर्ती छत्रपती शिवाजी पुतळ्यापर्यंत गेल्या. दुपारी तीन वाजेपर्यंत शिवाजी चौकातून तर सायंकाळी भवानी मंडपातील रांगाही कमी झाल्या नव्हत्या.करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रोत्सवात रविवार हा ऐतिहासिक आणि सुवर्णक्षण देणारा दिवस ठरला. देवीच्या दर्शनाच्या ओढीने लाखो भाविक कोल्हापुरात दाखल झाले आणि अंबा माता की जयचा गजर झाला. आजवरच्या कोणत्याही नवरात्रोत्सवात एवढी उच्चांकी गर्दी झाली नव्हती. दिवसात जास्तीतजास्त ४ लाखांपर्यंत भाविकांची नोंद व्हायची, पण रविवारी तब्बल ८ लाख भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. एवढे दिवस भवानी मंडपातच रांगा फिरविल्या जायच्या, पण रविवारी भाऊसिंगजी रोड आणि शिवाजी पुतळ्यापर्यंत तीन चार रांगा लागल्या होता. एवढे दिवस शिवाजी पुतळा ते भवानी मंडप या रस्त्याची एक बाजू वाहतुकीसाठी खुली असायची, पण रविवारी हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करावा लागला.सायंकाळी तुलनेने गर्दी कमी झाली आणि रांगा भवानी मंडपात येऊन स्थिरावल्या. रात्रीचा पालखी सोहळा होईपर्यंत ही दर्शन रांगही कमी झाली नव्हती.

पहाटे २ पासून रांगाअंबाबाईचा शनिवारचा पालखी सोहळा झाल्यानंतर, मध्यरात्री दोन वाजता देवस्थानचे अधिकारी व कर्मचारी मंदिराला कुलूप लावून जात होते. त्यावेळी परस्थ भाविकांनी मुख्य दर्शन रांगेत जात होते. त्यानंतर, हळूहळू रांगा वाढतच गेल्या आणि सकाळी ८ वाजताच रांग शिवाजी पुतळ्यापर्यंत गेली. दुपारी ३ वाजेपर्यंत येथे रांगा लागत होत्या. त्यानंतर, हळूहळू रांगा भवानी मंडपापर्यंत आल्या.

हरवले-सापडलेगर्दीमुळे अनेक भाविकांची आपल्या नातलगांशी चुकामुक होत होती. त्यामुळे दक्षिण दरवाज्यासमोरील पोलीस कंट्रोल रूम आणि मंदिर आवारातील सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाकडे भाविक आपल्या नातलगांचे नाव जाहीर करण्यासाठी येत होते. तीन लहान मुलेही हरवली होती, पण नाव पुकारल्यानंतर पालक नातेवाइकांची भेट होत होती.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरNavratriनवरात्रीMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर