शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

कोल्हापुरात पर्यटकांची मांदियाळी; वर्षअखेर, नाताळसाठी हजारो पर्यटकांचे आगमन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2023 13:35 IST

अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

कोल्हापूर : वर्षाचा अखेरचा दिवस तसेच नाताळ साजरा करण्याच्या बहाण्याने सलग सुट्यांची संधी साधत भाविक आणि पर्यटकांनी कोल्हापूर गजबजलेले आहे. गेल्या दोन दिवसांपासून भाविकांनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचा आणि त्याच्या नियोजनाचा बोजवारा उडालेला आहे.दरवर्षी उन्हाळा, दसरा, दिवाळी, नाताळ या सणांच्या निमित्ताने पडणाऱ्या सुट्यांमुळे कोल्हापुरात पर्यटकांची प्रचंड गर्दी असते. यंदाही भाविक आणि पर्यटकांना शनिवार, रविवारला जोडून नाताळची सोमवारची सुटी मिळाल्यामुळे सलग तीन दिवसांचा कालावधी सहलीसाठी मिळालेला आहे. त्यातच वर्षअखेरीलाही शनिवार आणि रविवारची सुटी येत असल्यामुळे हा संपूर्ण आठवडा कुटुंबीयांसमवेत तसेच मित्रमैत्रिणींसोबत सुटी घालवण्याची संधी मिळालेली आहे. शुक्रवारी सायंकाळपासूनच पर्यटनासाठी राज्यभरातील हजारो पर्यटक सहकुटुंब कोल्हापुरात दाखल झाले आहेत.परिसरातील पर्यटनस्थळांवर गर्दीअंबाबाई, जोतिबा या तीर्थक्षेत्रांसह जोतिबा डोंगर, किल्ले पन्हाळा, कणेरी मठ, गगनबावडा, नृसिंहवाडी, खिद्रापूर, रामलिंग डोंगर, चांदोली, राधानगरी अशी पर्यटनस्थळे पुन्हा बहरली आहेत. अंबाबाई मंदिरासह कोल्हापूर शहरातील रंकाळा चौपाटी, न्यू पॅलेस या ठिकाणांकडे भाविक आणि पर्यटकांचा विशेष ओढा आहे.

वाहतुकीची कोंडीशुक्रवारी दुपारपासून मुंबई-पुण्यासह अन्य जिल्ह्यांतील वाहने कोल्हापुरात दाखल होऊ लागल्याने महामार्गावर तसेच कोल्हापूर प्रवेशद्वाराजवळ वाहनांच्या रांगा लागल्या. शहरात अंबाबाई मंदिराला जोडणारे लक्ष्मीपुरी, बिंदू चौक, दसरा चौक, सीपीआर, मिरजकर तिकटी, शनिवार पेठ, रंकाळा या ठिकाणी सायंकाळी वाहतुकीची कोंडी होत होती.

वाहनतळेही हाऊसफुल्लमहामार्गापासून शहरांतर्गत रस्त्यांवरही ट्रॅफिक जाम झाले आहे. कोल्हापुरातील बिंदू चौक, खासबाग मैदान, शाहू मैदान परिसरातील वाहनतळांवर वाहनांची गर्दी आहे. दसरा चौकात तर वाहने लावण्यासाठी जागा उपलब्ध नाही. शिवाय शहरात रस्तोरस्ती वाहने लावलेली दिसून येत आहेत. भाड्याने गाड्या घेऊन कोल्हापुरात मुक्काम करून जवळच्या कर्नाटक, गोवा, कोकण येथेही जाण्याचे अनेकांनी नियोजन केलेले आहे.

हॉटेल्स, लॉज, धर्मशाळा हाऊसफुल्लपर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे परिसरातील हॉटेल्स आणि लॉज हाऊसफुल्ल झाले आहेत. महामार्गावरील धाबे, हॉटेल्स पर्यटकांनी भरलेले आहेत. याशिवाय रेस्टॉरंट, खाऊ गल्ली, धर्मशाळा, भक्तनिवास याठिकाणीही हाऊसफुल्ल गर्दी होती.

पन्हाळगडावर १६ हजार पर्यटकांची भेटऐतिहासिक पन्हाळगडावर गेल्या तीन दिवसांत सरासरी १६ हजार पर्यटकांनी भेट दिली आहे. रविवारी सर्वाधिक लोकांनी पन्हाळ्याला भेट दिली. यात सर्वाधिक सहलींचा समावेश आहे, अशी माहिती पन्हाळा नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

पन्हाळगड दर्शनासाठी आलेल्या पर्यटकांची आकडेवारीशुक्रवार - ३,०००शनिवार - ५,०००रविवार - ८,०००

गेल्या दोन दिवसांपासून भाविकांची अंबाबाई मंदिर परिसरात रीघ लागली आहे. रविवारीही दिवसभरात हजारो भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. -महादेव दिंडे, व्यवस्थापक, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती

टॅग्स :kolhapurकोल्हापूरtourismपर्यटन