राजाराम बंधाऱ्याभोवतीच मगरीचा संचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:23 IST2021-03-24T04:23:24+5:302021-03-24T04:23:24+5:30
या मगरींचे वारंवार दर्शन रात्रीच्या सुमारास होत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. काही जण सकाळच्या वेळेस ...

राजाराम बंधाऱ्याभोवतीच मगरीचा संचार
या मगरींचे वारंवार दर्शन रात्रीच्या सुमारास होत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. काही जण सकाळच्या वेळेस पोहण्यासाठी व जनावरे धुण्यासाठी बंधाऱ्यावर येत असतात. शेतकरीही शेतीच्या कामासाठी नदीकाठावर सतत ये-जा करत असतात. तसेच रात्रीच्या वेळी अनेक कामगारसुद्धा येथून जात असतात.
बंधाऱ्याजवळ किमान चार ते पाच मगरींचा वावर असावा अशी चर्चा आहे. त्यामुळे याबाबत वन्य जीव विभागाने या मगरींना पकडून अन्य मोठ्या जलाशयात सोडून द्यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
फोटो : २३ बावडा मगर
कॅप्शन - कसबा बावडा येथील राजाराम बंधाऱ्यावर सोमवारी रात्रीच्या सुमारास पुन्हा मगरीचे दर्शन झाले.