शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

राज्यातील सरकार ‘ईडी -सीबीआय’चे, कोल्हापुरात ‘आप’च्या निर्धार सभेत शिंदे सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 17:17 IST

चंद्रकांत पाटील यांना पैशाची मस्ती

कोल्हापूर : महाराष्ट्रातील सरकार जनतेने निवडून दिलेले सरकार नाही तर ईडी, सीबीआयने सत्तेत आणलेले सरकार आहे म्हणूनच आगामी निवडणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेतील रयतेचे सरकार आणण्यासाठी ‘आप’चे बटण दाबण्याचे आंदोलन हाती घ्या, असे आवाहन आम आदमी पक्षाचे राज्याचे सहप्रभारी गोपाल इटालिया यांनी बुधवारी रात्री मिरजकर तिकटी येथील निर्धार सभेत बोलताना केले.आम आदमी पक्षाच्या पंढरपूर ते रायगड या स्वराज्य यात्रेचे बुधवारी कोल्हापुरात शहरात आगमन झाले. त्यानिमित्ताने या निर्धार सभेचे आयोजन करण्यात आले होते.रयतेचे राज्य यावे ही छत्रपती शिवाजी महाराजांची संकल्पना होती. परंतु आज देशात आणि राज्यात रयतेला लूटणारी सरकार सत्तेत आहेत. या सरकारकडे विकासकामांना, शेतकऱ्यांना मदत करायला, शिक्षणावर खर्च करायला पैसे नाहीत पण निवडणुका आल्या की मते मिळविण्यासाठी यांच्याकडे पैसे येतात. प्रत्येक गोष्टीसाठी रयतेला आंदोलन करावे लागत आहे. आता एक आंदोलन हे सरकार हटविण्यासाठीही हाती घ्या, असे आवाहन इटालिया यांनी केले.स्वराज्य यात्रेचे फेरीतत्पूर्वी, आम आदमी पक्षाच्या स्वराज्य यात्रेची सुरुवात दसरा चौक येथून झाली. डोकीवर पक्षाची टोपी, हातात ध्वज घेतलेले शेकडो कार्यकर्ते स्वराज्य यात्रेत सहभागी झाले होते. 'आम आदमी की लहर हैं ' या गीताने कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला. या यात्रेत पक्षाचा रथ, ऑटो रिक्षा होत्या.चंद्रकांत पाटील यांना पैशाची मस्तीकोल्हापुरातून निवडून येऊ शकत नाही म्हणून मंत्री चंद्रकांत पाटील पुण्याला गेले तेथे टीका झाली तेव्हा त्यांनी काेणत्याही मतदार संघातून मी निवडून येऊ शकतो, असा दावा केला. हा माणूस पोत्याने पैसे वाटतो. त्यांना पैशांची मस्ती आहे. त्यांनी आपच्या विरोधात कोल्हापुरातून निवडणूक लढवावी, असे आव्हान रंगा राचुरे यांनी सभेत दिले. यावेळी नीलेश रेडेकर, उत्तम पाटील, संदीप देसाई यांची भाषणे झाली. शशांक लोखंडे यांनी आभार मानले. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAAPआपEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा