दादांवर टीका म्हणजे विकृतपणाचा कळस भाजपच्या संदीप देसार्इंची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 23:26 IST2017-11-10T23:25:04+5:302017-11-10T23:26:36+5:30
कोल्हापूर : आयुष्यभर दुसºयांच्या ओंजळीने पाणी पिणाºया व असंख्य फौजदारी गुन्हे दाखल असणाºयांनी,

दादांवर टीका म्हणजे विकृतपणाचा कळस भाजपच्या संदीप देसार्इंची टीका
कोल्हापूर : आयुष्यभर दुसºयांच्या ओंजळीने पाणी पिणाºया व असंख्य फौजदारी गुन्हे दाखल असणाºयांनी, स्वक र्तृत्वावर उत्तुंग पदावर पोहोचलेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करणे म्हणजे विकृतपणाचा कळस होय, अशा शब्दांत भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांनी महानगरपालिकेतील काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांच्यावर शुक्रवारी टीका केली. कोणाही लुंग्या-सुंग्याने पालकमंत्र्यांबद्दल बंद करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
काँग्रेसचे नगरसेवक शारंगधर देशमुख यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन पालकमंत्री पाटील यांच्यावर टीका केली होती. त्याला भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांनी शुक्रवारी एका पत्रकाद्वारे उत्तर दिले. पत्रकात देसाई यांनी म्हटले आहे की, महाराष्टÑ व कोल्हापूर जिल्'ाच्या विकासासाठी चंद्रकांत पाटील यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. कोल्हापूरचे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित होते, परंतु राज्य मंत्रिमंडळात क्रमांत दोनचे मंत्री होताच विकासकामांचा त्यांनी डोंगर उभा केला. दादांकडे असणाºया सकारात्मक ऊर्जेमुळे त्यांनी कधीच व्यक्तिगत द्वेषाकडे लक्ष दिले नाही. त्यामुळेच त्यांची प्रतिमा उजळत राहिली. दादांच्या कर्तृत्वाबद्दल, आचार व विचारसरणी समाजाच्या अंत्योदयाबद्दल विचार करून कार्य करणारे दादा किती मोठे व्यक्तिमत्त्व आहे याचे भान ठेऊन पत्रकबाजी करावी.
अलीकडच्या काळात उठसूट काही घडले की दादांच्या नावाने शंख करण्याचे काम काही मंडळी करत असतात. दादांना केवळ विकासकामात रस असल्यामुळे दादांनी अथवा पक्षाच्या अन्य पदाधिकाºयांनी कधीच सुडाचे राजकारण केले नाही. अधिकाºयांना बोलावून व्यक्तिगत काम करणे हा दादांचा स्वभाव नाही. कायदा व सुव्यवस्था योग्यरित्या राबविणाºया पोलीस प्रशासनाला कधीच कोणत्या प्रकारचा दबाव आणलेला नाही. त्यामुळे दादांच्या सकारात्मक व आशावादी कार्यपद्धतीमुळेच काही मंडळींना सतत पोटशूळ उठत असतो, असे देसाई यांनी म्हटले आहे.