शहरं
Join us  
Trending Stories
1
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
2
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
3
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
5
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
6
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
7
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
8
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
10
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
11
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
12
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
13
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
14
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
15
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
16
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
17
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
18
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
19
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
20
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
Daily Top 2Weekly Top 5

गुन्ह्यांमध्ये आता सरकारी कर्मचारी पंच

By admin | Updated: July 18, 2015 00:14 IST

दोषारोपसिध्दीचे प्रमाण घटत असल्याची बाब शासनाच्या निर्देशनात आली आहे. गुन्ह्याच्या तपासादरम्यान पंच म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांची सेवा घेतल्यास सुनावणीवेळी पंच फितूर होण्याची शक्यता फार कमी

शृंगारतळी : सरकारी कर्मचारी म्हणून रूबाबात वावरणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता सात वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यांमध्ये पंचाची भूमिका पार पाडावी लागणार आहे. यासंदर्भात दोन महिन्यांपूर्वी म्हणजेच मे मध्ये गृहविभागाने काढलेल्या शासन निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना पंच म्हणून कोर्टाची पायरी चढावी लागणार असल्याचे चित्र डोळ्यासमोर फिरू लागले आहे़गृह विभागाने काढलेल्या आदेशात असे म्हटले आहे की, एखादा गुन्हा घडल्यानंतर घटनास्थळाचा व वेळोवेळी पुरावा गोळा करताना तपास अधिकारी पंचनामा करीत असतात. अशा पंचनाम्यावेळी उपस्थित असलेल्या पंचांचे जबाब खटल्याच्या सुनावणीदरम्यान महत्त्वपूर्ण ठरत असतात. गुन्हा घडल्यानंतर खटला सुनावणीस येण्याकरिता काही प्रकारणांमध्ये बराच कालावधी उलटून गेलेला असतो.तपासी अधिकाऱ्याने तत्कालीन परिस्थितीत उपस्थित केलेले पंच सुनावणीदरम्यान प्रामाणिक राहतील, याची खात्री नसते. अशा परिस्थितीत पंच फितूर झाल्यामुळे गंभीर गुन्ह्यामध्ये आरोपी निर्दोष सुटतात. असे गृह विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे दोषारोपसिध्दीचे प्रमाण घटत असल्याची बाब शासनाच्या निर्देशनात आली आहे. गुन्ह्याच्या तपासादरम्यान पंच म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांची सेवा घेतल्यास सुनावणीवेळी पंच फितूर होण्याची शक्यता फार कमी राहिल. सात वर्षे किंवा सात वर्षापेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यामध्ये सरकारी कर्मचारी पंच म्हणून घेण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे शासन निर्णयात म्हणण्यात आले आहे. ही सेवा पंच म्हणून घेताना ज्या परिसरामध्ये खटल्याची सुनावणी होणार आहे, त्या परिसरात वास्तव असणाऱ्या कर्मचाऱ्यांची पंच म्हणून घ्यावे. जेणेकरून खटल्याच्या सुनावणी दरम्यान ही पंचासमक्ष उपस्थित राहणे सुलभ होईल. एकाच कर्मचाऱ्याला वांरवार पंच म्हणून घेण्यात येवू नये. फिर्यादी व आरोपीे यांचे नातेवाईक असलेल्या सरकारी कर्मचायास पंच म्हणून घेण्यात येवू नये, अशी अटही घालण्यात आली आहे. (वार्ताहर)