शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

मोसमच्या ज्ञानेश्वर दूध संस्थेच्या सचिव वायकुळवर फौजदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : मोसम (ता. शाहूवाडी) येथील ज्ञानेश्वर सहकारी दूध संस्थेच्या लेखापरीक्षणासाठी आवश्यक असणारे दफ्तर न दिल्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : मोसम (ता. शाहूवाडी) येथील ज्ञानेश्वर सहकारी दूध संस्थेच्या लेखापरीक्षणासाठी आवश्यक असणारे दफ्तर न दिल्याने सचिव सुभाष सीताराम वायकुळ (रा. मोसम) यांच्यावर लेखापरीक्षक उदयसिंह रावराणे यांनी शाहूवाडी पाेलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे.

ज्ञानेश्वर दूध संस्थेचे एप्रिल २०१५ ते मार्च २०१८ या कालावधीतील लेखापरीक्षण प्रलंबित हाेते. लेखापरीक्षणाबाबत आवश्यक ती कागदपत्रे सचिव सुभाष वायकुळ देत नाहीत, त्यांनी या कालावधीत अपहार केल्याबाबत संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण सोष्टे यांनी लेखापरीक्षण विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार या कालावधीतील दफ्तर उपलब्ध करुन देण्याबाबत संस्थेचे अध्यक्ष सोष्टे व सचिव वायकुळ यांना नोटीस दिली होती. दफ्तर एकमेकांच्या ताब्यात असल्याच्या सबबीखाली सादर केलेले नाही, त्यामुळे एप्रिल २०१५ ते मार्च २०१८ या कालावधीतील दफ्तर उपलब्ध नसल्याने लेखापरीक्षण करता येत नसल्याचे लेखापरीक्षक उदयसिंह रावराणे यांनी सहाय्यक निबंधक (दुग्ध) कोल्हापूर यांना कळविले होते. सहाय्यक निबंधकांनी दफ्तर ताब्यात घेण्याबाबत शाहूवाडी तहसीलदारांना कळविले होते. तहसीलदार कार्यालयाकडून शाहूवाडी पोलिसांना कारवाईचे आदेश देण्यात आले. त्यानुसार पोलिसांनी ३ ऑगस्ट २०२१ रोजी कारवाई केली, मात्र अपेक्षित दफ्तर सापडले नाही. यावेळी चौकशीअंती दफ्तर अध्यक्ष सोष्टे यांच्याकडे दिल्याचे सचिव वायकुळ यांनी सांगितले. मात्र, अध्यक्षांकडे कोणतेही दफ्तर अथवा दफ्तर प्राप्तची पाेहोच सादर केलेली नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संस्थेचे दफ्तर सांभाळण्याची जबाबदारी कायद्याने सचिवाची असते. सभासदांनी विश्वासाने सोपवलेल्या संस्था दफ्तराचा अपहार करुन त्याची विल्हेवाट लावल्याबद्दल सुभाष वायकुळ यांच्यावर लेखापरीक्षक उदयसिंह रावराणे यांनी फौजदारी गुन्हा दाखल केला आहे.