‘तावडे हॉटेल’प्रकरणी अधिकाऱ्यांवर फौजदारीची मागणी

By Admin | Updated: June 7, 2014 00:54 IST2014-06-07T00:51:06+5:302014-06-07T00:54:39+5:30

परिसरातील बांधकामाबाबत उच्च न्यायालयाने ‘जैसे थे’चा आदेश

Criminal Demand for Officials in 'Tawde Hotel' | ‘तावडे हॉटेल’प्रकरणी अधिकाऱ्यांवर फौजदारीची मागणी

‘तावडे हॉटेल’प्रकरणी अधिकाऱ्यांवर फौजदारीची मागणी

कोल्हापूर : गांधीनगर रोड, उचगाव हद्दीतील तावडे हॉटेल परिसरातील बांधकामाबाबत उच्च न्यायालयाने ‘जैसे थे’चा आदेश दिला आहे. दरम्यान, रि.स.नं. १४४ येथे विनापरवाना बांधकाम सुरू आहे. याबाबतचे पुरावे सादर करूनही कारवाई केली जात नाही. ३० दिवसांच्या आत कारवाई करा अन्यथा महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ कलम ५६ नुसार फौजदारी दाखल करण्याचा इशारा आज, शुक्रवारी प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई यांनी निवेदनाद्वारे महापालिकेला दिला आहे.
‘प्रजासत्ताक’ने विभागीय कार्यालय क्रमांक चारचे उपशहर अभियंता एम. एम. निर्मळे, साहाय्यक अभियंता आर. के. जाधव, कनिष्ठ अभियंता एस. पी. नागरगोजे यांच्यासह आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांना लेखी पत्राद्वारे कारवाई करण्याबाबत विनंती केली.
विभागीय कार्यालयाने अद्याप प्राथमिक पाहणीही केलेली नाही. विनापरवाना बांधकामास महापालिकेतील अधिकारीच पाठीशी घालत आहेत. त्यामुळे ‘प्रजासत्ताक’ने नोटिसीद्वारे ३० दिवसांची कारवाईची मुदत दिली आहे.
या वेळेत कारवाई न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे दिलीप देसाई यांनी पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Criminal Demand for Officials in 'Tawde Hotel'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.