ऊसाला कमी दर देणा-या साखर कारखान्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल
By Admin | Updated: January 1, 2015 15:58 IST2015-01-01T15:58:28+5:302015-01-01T15:58:28+5:30
शेतक-यांच्या मालाला रास्त दर मिळावा यासाठी आता वकिलांनीही कंबर कसली असून मानवाधिकारांचे संरक्षण करणा-या वकिलांनी साखर कारखान्यांविरोधात फोजदारी गुन्हे दाखल करण्याचा धडाका
ऊसाला कमी दर देणा-या साखर कारखान्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल
>ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. १ - शेतक-यांच्या मालाला रास्त दर मिळावा यासाठी आता वकिलांनीही कंबर कसली असून मानवाधिकारांचे संरक्षण करणा-या वकिलांनी साखर कारखान्यांविरोधात फोजदारी गुन्हे दाखल करण्याचा धडाका लावला आहे. एफआरपी किंवा फेअर अँड रेमिनेटिव्ह प्राइझप्रमाणे ऊसाला किंमत मिळणे कायद्याला अभिप्रेत असून कमी दर देणा-या साखर कारखान्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येत आहेत, त्यामुळे साखर कारखान्यांचे धाबे दणाणले आहे.
एफ आर पी (fair and reminative prize) प्रमाणे दर न दिल्याबद्दल व उस उत्पादक शेतक-यांची फसवणूक केल्याबद्दल आज सोनहिरा व केन अग्रो साखर कारखान्यावर कड़ेगाव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगली जिल्हा सुधार समिती व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने संदीप राजोबा यांच्या वतीने अॅड. अमित शिंदे यांनी फिर्याद दाखल केली आहे. जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यावर अशा फिर्यादी दाखल करणार असल्याचे शेतक-यांची बाजू मांडणा-या वकिलांनी सांगितले. या अभियानाची आजपासून करण्यात आली असून आज सोमवारी सोनहिराचे चेअरमन मोहनराव कदम व केन अग्रोचे पृथ्वीराज देशमुख यांच्यावर पहिली फिर्याद दाखल करण्यात आली आहे.