लॅपटॉप चोरीप्रकरणी सराईत गुन्हेगारास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:49 IST2020-12-17T04:49:40+5:302020-12-17T04:49:40+5:30
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिवाजी पार्कमधील शरवील प्रशांत काळे यांनी दि. ७ ऑक्टोबरला रात्री आपल्या घरासमोर मोटार पार्क ...

लॅपटॉप चोरीप्रकरणी सराईत गुन्हेगारास अटक
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिवाजी पार्कमधील शरवील प्रशांत काळे यांनी दि. ७ ऑक्टोबरला रात्री आपल्या घरासमोर मोटार पार्क केली होती, त्याच रात्री अज्ञात चोरट्याने त्यांच्या मोटारीची काच फोडून आतील सुमारे ३० हजार रुपये किंमतीचा लॅपटॉप चोरला होता. दरम्यान, खबऱ्याने हा लॅपटॉप रेकॉर्डवरील गुन्हेगार सचिन आगलावे याने चोरल्याची माहिती शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांना मिळाली. त्यांनी गुन्हे शोधपथकाला त्याबाबत सूचना दिल्या. पोलिसांनी सखोल तपास करून संशयित सचिन आगलावे याला अटक करून त्याच्याकडील चोरलेला लॅपटॉप जप्त केला. ही कारवाई गुन्हे शोधपथकाचे उपनिरीक्षक सचिन पांढरे, सहायक फौजदार प्रकाश भंडारे, कॉन्स्टेबल अशोक पाटील, युवराज पाटील आदींनी केली.
फोटो नं. १६१२२०२०-कोल-सचिन आगलावे (आरोपी-लॅपटॉप चोरी)
तानाजी