मास्क कारवाईत अडथळा आणणाऱ्या दुचाकीचालकांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2020 11:42 AM2020-11-13T11:42:41+5:302020-11-13T11:46:22+5:30

police, crimenews, coronavirus, kolhapurnews मास्क न लावल्याबद्दल कारवाई करताना महापालिका कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणल्याबद्दल लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दुचाकीचालकांवर गुरुवारी गुन्हा दाखल झाला. करण लडगे असे त्या संशयिताचे नाव आहे. हा प्रकार रंकाळा टॉवर येथे घडला.

Crimes against two-wheelers obstructing mask action | मास्क कारवाईत अडथळा आणणाऱ्या दुचाकीचालकांवर गुन्हा

मास्क कारवाईत अडथळा आणणाऱ्या दुचाकीचालकांवर गुन्हा

Next
ठळक मुद्देअडथळा आणणाऱ्या दुचाकीचालकांवर गुन्हामास्क न लावल्याबद्दल कारवाई

कोल्हापूर : मास्क न लावल्याबद्दल कारवाई करताना महापालिका कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणल्याबद्दल लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दुचाकीचालकांवर गुरुवारी गुन्हा दाखल झाला. करण लडगे असे त्या संशयिताचे नाव आहे. हा प्रकार रंकाळा टॉवर येथे घडला.

पोलिसांनी दिलेली माहिती, कोविड संसर्गामुळे बाहेर फिरताना नागरिकांनी तोंडाला मास्क लावणे, दोघांत सुरक्षित अंतर ठेवणे, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे या अटींचे पालन करणे बंधनकारक असतानाही त्यांचे पालन न करणाऱ्यांवर महापालिकेचे कर्मचारी हे पोलिसांच्या मदतीने कारवाई करीत आहेत.

रंकाळा टॉवर येथे करण लडगे नावाचा युवक दुचाकीवरून मास्क न घालता जात होता. आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याला १०० रुपये दंडाची पावती करण्यास सांगितले; पण त्याने कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून सरकारी कार्यात अडथळा निर्माण केला, अशी तक्रार ज्योती सणगर यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दिली.

Web Title: Crimes against two-wheelers obstructing mask action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.