क्राईम संक्षिप्त कोल्हापूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:22 IST2021-03-06T04:22:31+5:302021-03-06T04:22:31+5:30

कोल्‍हापूर : कुत्र्यांना हटकल्‍याच्‍या कारणावरून झालेल्‍या भांडणात मायलेकास मारहाण करण्‍यात आली. संभाजीनगरातील ओम गणेश कॉलनीत शुक्रवारी सकाळी हा प्रकार ...

Crime Brief Kolhapur | क्राईम संक्षिप्त कोल्हापूर

क्राईम संक्षिप्त कोल्हापूर

कोल्‍हापूर : कुत्र्यांना हटकल्‍याच्‍या कारणावरून झालेल्‍या भांडणात मायलेकास मारहाण करण्‍यात आली. संभाजीनगरातील ओम गणेश कॉलनीत शुक्रवारी सकाळी हा प्रकार घडला. जोत्‍स्‍ना मोहन सातारकर (वय ५५) व अनुप मोहन सातारकर (३४) अशी जखमींची नावे आहेत. जखमींवर सीपीआर रुग्‍णालयात उपचार करण्‍यात आले असून, त्याची नोंद जुना राजवाडा पोलिसांत झाली आहे.

बोंद्रेनगरात तरुणास मारहाण

कोल्‍हापूर : बोंद्रेनगरातील जांभळे कॉलनीत गुरुवारी मध्यरात्री तरुणाला मारहाण केल्याची घटना घडली. सर्जेराव धाकलू देवणे (वय ३२) असे जखमीचे नाव आहे. जखमीला उपचारासाठी सीपीआरमध्‍ये दाखल करण्‍यात आले. याची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली.

अज्ञात वाहनाच्‍या धडकेत तरुण जखमी

कोल्‍हापूर : अज्ञात वाहनाने दिलेल्‍या धडकेत इंद्रजित उदयसिंह सरनोबत (वय २६, रा. आसुर्ले, पन्‍हाळा) जखमी झाला. गुरुवारी रात्री वडणगे फाटा (ता. करवीर) येथे हा अपघात घडला. जखमीला उपचारासाठी सीपीआरमध्‍ये दाखल करण्‍यात आले. याची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली.

Web Title: Crime Brief Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.