तरुणास धमकी, नगरसेवक महेश गायकवाडवर गुन्हा

By Admin | Updated: September 6, 2015 00:33 IST2015-09-06T00:33:40+5:302015-09-06T00:33:40+5:30

शिवीगाळ करून बघून घेण्याची धमकी

Crime against youth, corporator Mahesh Gaikwad | तरुणास धमकी, नगरसेवक महेश गायकवाडवर गुन्हा

तरुणास धमकी, नगरसेवक महेश गायकवाडवर गुन्हा

कोल्हापूर : माझ्या कार्यकर्त्यांना दमदाटी करतोस काय, असे म्हणून तरुणास शिवीगाळ करून बघून घेण्याची धमकी मोबाईलवरून दिल्याप्रकरणी नगरसेवक महेश रामचंद्र गायकवाड (रा. साळोखेनगर) यांच्यावर शनिवारी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
याबाबत पोलिसांनी सांगितले, फिर्यादी सूरज नेताजी मणेराजुरी (वय २३, रा. साळोखेनगर) हा शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास घरासमोर उभा होता. यावेळी घराशेजारी राहणाऱ्या अजिंक्य लोखंडे याने मोटारसायकल भरधाव आणून त्याच्यासमोर उभी केली. यावेळी त्याने अंगावर गाडी घालतोस काय? अशी विचारणा केली. यावरून त्यांच्यात वादावादी होऊन थांब तुला दाखवितो, असे म्हणून अजिंक्य तेथून निघून गेला. त्यानंतर सूरजच्या मोबाईलवर नगरसेवक महेश गायकवाड यांनी फोन करून माझ्या कार्यकर्त्यांना दमदाटी करतोस काय? असे म्हणून शिवीगाळ करीत बघून घेण्याची धमकी दिली. त्यानंतर सूरजने पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)

Web Title: Crime against youth, corporator Mahesh Gaikwad