लैंगिक अत्याचाराप्रकरणी एकावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:25 IST2021-08-15T04:25:24+5:302021-08-15T04:25:24+5:30

कोल्हापूर : लग्नाचे आमिष दाखवून, शारीरिक संबंध ठेवून वारंवार पैशांची मागणी करीत मारहाण केल्याप्रकरणी करवीर पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल ...

Crime against one in a sexual assault case | लैंगिक अत्याचाराप्रकरणी एकावर गुन्हा

लैंगिक अत्याचाराप्रकरणी एकावर गुन्हा

कोल्हापूर : लग्नाचे आमिष दाखवून, शारीरिक संबंध ठेवून वारंवार पैशांची मागणी करीत मारहाण केल्याप्रकरणी करवीर पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला. सागर सखाराम मांडवकर (रा. जवाहरनगर, मूळ रा. घाटकरवाडी, ता. आजरा) असे गुन्हा दाखल केलेल्या संशयिताचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयिताने एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत आर.के.नगर, कंदलगाव भारती विद्यापीठासमोर, जवाहरनगर व घाटकरवाडी येथील घरी लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. यासह फिर्यादीकडून वेळोवेळी पैशांची मागणी करून पैसे दिले नाही की मारहाण केली. आत्महत्या करणार अशी भीती घालून फिर्यादीचे नवऱ्यासोबत जबरदस्तीने घटस्फोट घेण्यास भाग पाडले. याबाबत पीडितेने शनिवारी (दि. १४) फिर्याद दिली. त्यानुसार संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक विक्रांत चव्हाण तपास करीत आहेत.

Web Title: Crime against one in a sexual assault case