विवाहितेच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:30 IST2021-09-07T04:30:25+5:302021-09-07T04:30:25+5:30

कोल्हापूर : विवाहितेला ‘तू फार सुंदर दिसतेस’ असे म्हणून तिच्या साडीचा पदर ओढून लज्जास्पद वर्तन करून विनयभंग केल्याचा प्रकार ...

Crime against one in marital molestation case | विवाहितेच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा

विवाहितेच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा

कोल्हापूर : विवाहितेला ‘तू फार सुंदर दिसतेस’ असे म्हणून तिच्या साडीचा पदर ओढून लज्जास्पद वर्तन करून विनयभंग केल्याचा प्रकार कोल्हापुरात घडला. याप्रकरणी दत्तात्रय तुकाराम गुरव (वय ३७, रा. आवळी बुद्रुक, ता. राधानगरी) याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विवाहिता व तिचा मुलगा दोघे घरी होते, त्या वेळी घराबाहेर कोणीतरी दुचाकी सुरू करून वारंवार रेस करत असल्याचा आवाज येत होता. त्यामुळे विवाहिता व तिचा मुलगा घराबाहेर आले, त्यावेळी संशयित आरोपी दत्तात्रय गुरव हा आपल्या दुचाकीवरुन खाली उतरला व त्याने त्या विवाहितेला ‘तू फार सुंदर दिसतेस’ असे म्हणून तिच्या साडीचा पदर जोरात ओढून लज्जास्पद वर्तन केले. अचानक झालेल्या प्रकारामुळे विवाहिता घाबरली. त्या वेळी तिचा मुलगा पुढे आला. गुरव याने त्याला तुला काय पाहिजे रे, तुला उचलून नेतो व उलटा टांगतो अशी धमकी दिली, अशी फिर्याद पीडित विवाहितेने दिल्याने गुरव याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Crime against one in marital molestation case