सानेगुरुजी वसाहतीमधील डॉक्टरांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:23 IST2021-05-01T04:23:16+5:302021-05-01T04:23:16+5:30
कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या काळात डॉक्टरपत्नी कोरोनाबाधित आढळल्यानंतरही डॉक्टरने स्वत: होम क्वारंटाईन न होता आपला दवाखाना सुरू ठेवला, म्हणून ...

सानेगुरुजी वसाहतीमधील डॉक्टरांवर गुन्हा
कोल्हापूर : कोरोना संसर्गाच्या काळात डॉक्टरपत्नी कोरोनाबाधित आढळल्यानंतरही डॉक्टरने स्वत: होम क्वारंटाईन न होता आपला दवाखाना सुरू ठेवला, म्हणून सानेगुरुजी वसाहत येथील डॉ. अतुल चव्हाण यांच्यावर महापालिकेने गुरुवारी रात्री उशिरा जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
डॉ. अतुल चव्हाण यांचा सानेगुरुजी वसाहत येथे दवाखाना आहे. त्यांच्या पत्नी दि. २७ एप्रिल रोजी कोरोनाबाधित असल्याचे लक्षात आले. त्यानंतर प्रभाग सचिव यांनी शोध घेतला असता, डॉ. चव्हाण हे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना नीट उत्तर देत नव्हते. त्यामुळे गुरुवारी उपायुक्त निखिल मोरे काही वैद्यकीय अधिकाऱ्यांना घेऊन त्यांच्याकडे गेले, तेव्हा त्यांची ओपीडी सुरू होती. तसेच त्यांच्याकडे १० ते १२ रुग्ण उपस्थित होते.
डॉ. चव्हाण यांनी कोविड चाचणी केली आहे की नाही, स्वॅब दिला आहे की नाही, याची कोणतीही माहिती द्यायला ते तयार नव्हते. तसेच पत्नी बाधित असल्याचे आढळून आल्यानंतर त्यांनी स्वत: क्वारंटाईन होणे अपेक्षित होते. तरीही त्यांनी ओपीडी सुरू ठेवल्याचे निदर्शनास आल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.