राधानगरी धरणस्थळावर शाहू जयंती साजरी करणा-या कार्यकर्त्यांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:18 IST2021-07-01T04:18:28+5:302021-07-01T04:18:28+5:30

राधानगरी धरणस्थळी शाहूमहाराजांची जयंती कार्यक्रम केल्याप्रकरणी संयोजक संभाजी आरडे यांच्यासह पंधरा लोकांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबतची ...

Crime against activists celebrating Shahu Jayanti at Radhanagari dam site | राधानगरी धरणस्थळावर शाहू जयंती साजरी करणा-या कार्यकर्त्यांवर गुन्हा

राधानगरी धरणस्थळावर शाहू जयंती साजरी करणा-या कार्यकर्त्यांवर गुन्हा

राधानगरी धरणस्थळी शाहूमहाराजांची जयंती कार्यक्रम केल्याप्रकरणी संयोजक संभाजी आरडे यांच्यासह पंधरा लोकांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पाटबंधारे विभागाचे सुभाष गोविंद पाटील यांनी दिली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना निर्बंधांमुळे संचारबंधी व अन्य निर्बंध आहेत. लक्ष्मी तलाव येथे गर्दी जमवून भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम केला होता. पोलिसांनी याला परवानगी नाकारून प्रतिबंधात्मक नोटीस दिली होती.

गुन्हे दाखल झालेल्यांमध्ये भाजपचे तालुकाध्यक्ष संभाजी आरडे, दीपक मगर, लहू जरग, बाळासाहेब पाटील, भय्या इंगळे, दीपक शिरगावकर, युवराज पाटील, विशाल पाटील, सुभाष जाधव, संतोष कातीवले, महेश पाटील, सुनील पाटील, भूषण पाटील यांच्यासह शंभर ते दीडशे अज्ञात लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Crime against activists celebrating Shahu Jayanti at Radhanagari dam site