शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
3
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
4
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
5
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
6
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
7
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
8
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
9
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
10
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
11
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
12
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
13
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
14
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
15
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
16
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
17
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
18
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
19
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लजच्या नगराध्यक्षांसह २१ जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:47 IST

गडहिंग्लज : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन करून शिवजयंतीची मिरवणूक काढल्याप्रकरणी गडहिंग्लजच्या नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी, उपनगराध्यक्ष ...

गडहिंग्लज : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन करून शिवजयंतीची मिरवणूक काढल्याप्रकरणी गडहिंग्लजच्या नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी, उपनगराध्यक्ष महेश कोरी यांच्यासह ११ नगरसेवक मिळून २१ जणांवर गडहिंग्लज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच मिरवणुकीतील चित्ररथांच्या १८ ट्रॅक्टरवर देखील कारवाई करण्यात आली आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक, नगरसेवक बसवराज खणगावे, राजेश बोरगावे, नितीन देसाई, उदय पाटील, नरेंद्र भद्रापूर, दीपक कुराडे, नगरसेविका सुनीता पाटील, वीणा कापसे, नाझ खलिफा, श्रद्धा शिंत्रे व शशिकला पाटील, प्रकाश तेलवेकर, बाळासाहेब भैसकर, सागर पाटील, शिवाजी कुराडे, इम्रान मुल्ला, विनोद लाखे, लता पालकर यांचा समावेश आहे.

पोलिसातून मिळालेली माहिती अशी, कोविड १९ रोगाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शिवजयंतीच्या निमित्ताने सार्वजनिक ठिकाणी गर्दी करण्यास व मिरवणुका काढण्यास मनाई केली होती.याबाबत पोलिसांनी तोंडी व लेखी सूचना दिल्या होत्या, तरीदेखील बेकायदेशीररीत्या गर्दी जमवून शिवजयंतीची मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान, मिरवणूक

दसरा चौकात आल्यानंतर चित्ररथांचे ट्रॅक्टर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यावेळी मिरवणुकीतील कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करून वाहतुकीत अडथळा निर्माण केला आणि जमाव पांगविणाऱ्या पोलिसांशी हुज्जत घातली.

हेड कॉन्स्टेबल संभाजी पाटील यांच्या फिर्यादीवरून गडहिंग्लज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस नाईक रविकांत शिंदे अधिक तपास करत आहेत.