शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकताच कोल्हापुरात क्रिकेट शौकिनांचा जल्लोष -video

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 12:30 IST

कोल्हापूर : दुबईच्या मैदानात आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा २५ वर्षांचा हिशोब चुकता करत चॅम्पियन्स ...

कोल्हापूर : दुबईच्या मैदानात आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा २५ वर्षांचा हिशोब चुकता करत चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपलं नाव कोरताच कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात रविवारी रात्री क्रिकेटच्या चाहत्यांनी मोठा जल्लोष केला. भारतीय संघाने विक्रमी तिसऱ्यांदा ही ट्रॉफी जिंकली आहे. १२ वर्षांनंतर भारतीय संघानं वन डे आयसीसी स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे.दुबई येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये भारताने मिळवलेल्या या विजयानंतर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तरुण क्रिकेटप्रेमी लगेच जमले. त्यांनी तेथेच एकच जल्लोष केला. विजय मिळताच अनेक तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे आले.

तिरंगा आणि भगव्या झेंड्यांसह गर्दी वाढू लागली. स्पीकरवर विजयी गीत वाजवत अनेकजण चौकात थिरकू लागले. सुमारे तासभर या ठिकाणी एकच जल्लोष आणि आतषबाजी झाली. जल्लोषानंतर पोलिसांनी येथील गर्दी पांगवत परिसर मोकळा केला.

इचलकरंजीत मोठा जल्लोष, रंगपंचमीपूर्वीच रंगांची उधळण इचलकरंजी : चॅम्पियन ट्रॉफीवर भारताने आपले नाव कोरल्यानंतर क्रिकेटप्रेमी तरुणाई येथील मलाबादे चौकात येऊन विजयाचा जल्लोष व फटाक्याची आतषबाजी केली. संपूर्ण परिसर गुलाल आणि पिवडीने न्हाहून निघाला होता.भारताने विजय मिळविल्यानंतर मोटारसायकलीने मलाबादे चौकामध्ये तरुणाई एकत्र जमू लागली, रोहित शर्मा, विराट कोहली यांची छायाचित्रे, तिरंगा आणि भगवा झेंडा घेऊन तरुणाईने पाहता पाहता मलाबादे चौक, गांधी कॅम्प, जुनी नगरपालिका, गांधी पुतळा परिसर व्यापला आणि जल्लोष केला. पाहता पाहता सुमारे दहा हजारांहून अधिक लोक या रस्त्यावर जमले. रंगपंचमीपूर्वीच तरुणाईने रंगांची उधळण केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरChampions Trophyचॅम्पियन्स ट्रॉफी २०२५Indiaभारत