शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
3
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
4
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
5
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
6
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
7
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
8
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
9
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
10
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
11
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
12
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
13
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
14
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
15
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
16
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
17
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
18
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
19
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
20
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: ८० फुटांवर पाळणा अडकला, १८ जणांचा जीव टांगणीला; सर्वांना सुखरूप खाली आणण्यात यश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 14:26 IST

कागल येथील उरुसातील घटना

कागल : येथे सुरू असलेल्या श्री गहिनीनाथ हजरत गैबीपीर उरुसात दूधगंगा डेअरीजवळ उभारण्यात आलेला जाॅइंट व्हील नावाचा पाळणा तांत्रिक कारणाने वर जाऊन अडकल्याने या पाळण्यात बसलेले अठरा जण ऐंशी फुटांवर जाऊन तब्बल चार तास अडकले. रात्री ०८:३० वाजता हे पाळण्यात बसले होते. रात्री ११:३० वाजेपासून कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या बचाव पथकाने एका- एका व्यक्तीस खाली घेण्यास सुरुवात केली. रात्री १२:३० वाजता सर्व जण सुखरूप खाली आले. यामध्ये पाच महिला चार लहान मुले व नऊ पुरुषांचा समावेश होता. हे सर्व जण कागल, कणेरी मठ, गोकुळ शिरगाव येथील होते.तब्बल चार तास हा थरार चालला. सर्व जण खाली येण्यासाठी प्रतीक्षा करीत होते. आपण इतक्या उंचीवर येऊन अडकलो आहोत. या भीतीने चिंताग्रस्त होऊन हे लोक एकमेकांना धीर देत होते, तर खाली नातेवाईक त्यांना हातवारे करून धीर देण्यासाठी धडपडत होते. मोबाइल फोनवरील संपर्क यासाठी मोठा आधार ठरला. यामुळे कोणता गोंधळ उडाला नाही. सर्वांनी संयम बाळगला. कोल्हापूर महानगरपालिकेच्या टर्न टेबल लॅडर गाडीने रात्री ११:०० वाजेच्या सुमारास एका- एका व्यक्तीस खाली उतरविण्यात सुरुवात करताच उपस्थित नागरिकांनी टाळ्या वाजवल्या आणि प्रशासनासह सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. कागल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गर्दीवर नियंत्रण मिळविले. उरुसानिमित्त दरवर्षी येथे लहान- मोठ्या आकारांतील पाळणे येतात. गेल्या दोन वर्षांपासून हा जाॅइंट व्हील नावाचा पाळणा येत आहे. यामध्ये वर्तुळाकारात समोर तोंड करून मांडलेल्या खुर्चीवर लोकांना बसतात. हे वर्तुळाकार चक्र लोखंडी अँगल वरून सरकत वर ऐंशी फुटांवर जाते व तेथे स्थिर होऊन फिरते, अशी याची रचना आहे. सायंकाळी ०७:०० वाजता हा पाळणा सुरू झाला. रात्री ०८:३० वाजेच्या सुमारास तांत्रिक कारणाने हे गोलाकार चक्र वर जाऊन अडकले. पाळणा चालकांनी तासभर प्रयत्न केला; पण यश आले नाही. शेवटी कोल्हापूरहून महापालिकेचे बचाव पथक बोलवून यात अडकलेल्या सर्वांना बाहेर काढले. याप्रसंगी उरूस समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रवीण काळबर, सौरभ पाटील, दीपक मगर, अमित पिष्टे, विवेक लोटे आदींनीही या कामात मदत केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Ferris wheel stuck at 80 feet, 18 rescued safely.

Web Summary : In Kolhapur, a ferris wheel malfunctioned, stranding 18 people 80 feet high for four hours. Firefighters rescued all, including women and children, safely.