‘सीपीआर’ सर्व रोगांवरील उपचारांसाठी खुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:20 IST2020-12-08T04:20:04+5:302020-12-08T04:20:04+5:30
कोल्हापूर : जिल्ह्यात संसर्ग वाढल्यामुळे कोरोना रुग्णांवरील उपचाराकरिता राखीव ठेवण्यात आलेल्या येथील ‘सीपीआर’ रुग्णालयात आता पूर्ववत सर्व रोगांवरील उपचार ...

‘सीपीआर’ सर्व रोगांवरील उपचारांसाठी खुले
कोल्हापूर : जिल्ह्यात संसर्ग वाढल्यामुळे कोरोना रुग्णांवरील उपचाराकरिता राखीव ठेवण्यात आलेल्या येथील ‘सीपीआर’ रुग्णालयात आता पूर्ववत सर्व रोगांवरील उपचार सुरु करण्यात आले. सोमवारी रुग्णालयात मात्र नेहमीपेक्षा तुलनेते गर्दी कमी दिसून आले. रुग्णालय सर्वोपचाराकरिता सुरू झाले असले तरी पुढीलकाळात शस्त्रक्रियांची संख्या वाढविण्याची मागणी होऊ लागली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात मार्च महिन्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ‘गरिबांचा दवाखाना’ म्हणून ओळख असलेले सीपीआर रुग्णालय कोविड रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले. त्यानंतर तेथे केवळ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू ठेवण्यात आले. तेथील सर्व विभाग तात्पुुुुुुुुरते कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयाकडे वर्ग करण्यात आले. या बदलामुळे ऐन कोरोना महामारीत गोरगरीब रुग्णांची मात्र मोठी गैरसोय सुरू झाली. आता जिल्ह्यातील कोरोनाची साथ पूर्णपणे नियंत्रणात आली असून रोज समोर येणाऱ्या रुग्णांची प्रमाणही प्रचंड कमी झाले आहे.
साथ नियंत्रणात असल्यामुळे सीपीआर रुग्णालयात पूर्ववत सर्व रोगांवर उपचार सुरू करावेत, अशी मागणी जोर धरत होती. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी या मागणीचा पाठपुरावा केला. शनिवारीही त्यांनी एक बैठक घेऊन अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांना त्यांनी पूर्ववत रुग्णालय सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सोमवारपासून या रुग्णालयात सर्व रोगांवर उपचार सुरू करण्यात आले.
केवळ मेडिसीन विभागवगळता बाकी सर्व विभाग मागच्या आठवड्यात सुरू झाले. सोमवारी मेडिसीन विभागही सुरू करण्यात आला. नेत्ररोग व अस्थीरोग विभागाच्या ओपीडी सुरू आहेत परंतु तेथे एक दोन शत्रक्रियाच होतात. त्यामुळे वेटिंग वाढत चालले आहे. रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. रोजच्या शस्त्रक्रियांची संख्या वाढवावी, अशी मागणी जोर धरत आहे. प्रसुतिगृह आता सुरू झाल्याने रुग्णांची झालेली गैरसोय दूर झाली.
डॉक्टरांच्या कामाचे नियोजन आवश्यक
कोरोनाकाळात सीपीआरमधील बहुतेक सर्वच विभागप्रमुख तसेच तेथील डॉक्टर्सना कोरोनाचे एकच काम देण्यात आले होते. त्यामध्ये एन्ट्रन्शीप करण्यासाठी आलेल्या डॉक्टरसुद्धा त्यांच्या मूळ कामापेक्षा कोरोनाचेच काम देण्यात आले. आजही त्यांना तेच काम करावे लागत आहे. कोरोनाचा संसर्ग संपला असताना डॉक्टर्सना त्यांच्या मूळ कामावर नेमण्यात आलेले नाही. त्यामुळे सीपीआरमध्ये रुग्ण कमी आणि डॉक्टर्स जादा असे काहीसे विसंगत चित्र पाहायला मिळत आहे. (
फोटो देत आहे)