शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

प्रशांत कोरटकरचा जामीन न्यायालयाने फेटाळला, कळंबा जेलमधील मुक्काम वाढला

By भीमगोंड देसाई | Updated: April 1, 2025 17:55 IST

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकावणारा नागपूरचा ...

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकावणारा नागपूरचा प्रशांत मुरलीधर कोरटकर याचा जामीन अर्ज मंगळवारी फेटाळला. चौथे सह कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश एस. एस. तट यांच्यासमोर दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद झाले. सुरक्षेच्या कारणावरून प्रत्यक्ष उपस्थित न ठेवता कोरटकर यास व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणीस हजर ठेवले. सरकारतर्फे ॲड. सूर्यकांत पोवार यांनी प्रत्यक्ष हजर राहून तर सावंत यांचे वकील ॲड. असीम सरोदे आणि कोरटकर याचे वकील सौरभ घाग यांनीही व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे युक्तिवाद केला.कोरटकर सध्या १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे.. त्याला कळंबा कारागृहातील स्वतंत्र कोठडीत ठेवण्यात आले आहे. त्याच्या जामीन अर्जावरील सुनावणीत कोरटकर याचे वकील घाग म्हणाले, सावंत यांनी समाजमाध्यमात संभाषण व्हायरल केल्यानंतर कोरटकर यांनी नागपूर पोलिसात तक्रार दिली. त्यात त्यांनी सावंत यांच्याशी माझी ओळख नाही. माझा मोबाइल हॅक झाला होता. त्यामुळे माझा आवाज काढून त्यांच्याशी कोणी तरी संभाषण केले असावे, असे म्हटले आहे. कोरटकर आणि फिर्यादी यांच्या आवाजाचे नमुने घेतले आहेत. कोरटकर यांनी समाजात तेढ निर्माण केलेली नाही. म्हणून त्यांचा जामीन अर्ज मंजूर करावा.सरकारी वकील पोवार म्हणाले, कोरटकर याचा मोबाइल हॅक झाला हा दावा खोटा आहे. राष्ट्रपुरुषांचा त्याने हेतूपुरस्सर अवमान केला आहे. त्याचा हेतूच समाजात अशांतता, तेढ निर्माण करण्याचा होता. मराठा आणि ब्राह्मण समाजात दरी निर्माण होईल, असे तो बोलला आहे. अजूनही तपास पूर्ण झालेला नाही. तो पत्रकार असल्याने ओळखीच्या माध्यमातून पुढील तपासात दबाव आणून अडथळा आणू शकतो. साक्षीदारांना धमकावू शकतो. जामीन झाला तर समाजात चुकीचा संदेश जाईल.

पुन्हा फरार होण्याची शक्यताकोरटकर याने सावंत यांना फोन करून धमकी दिली. राष्ट्रपुरुषांबद्दल बदनामीकारक वक्तव्य केले. त्यानंतर तो वेगवेगळ्या राज्यात प्रवास करून पोलिसांना चकवा दिला. महिन्यानंतर म्हणजे २५ मार्चला त्याला अटक झाली आहे. जामीन झाल्यानंतरही तो फरार होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले.

सावंत यांची लेखी माफी मागावीसावंत हे इतिहास संशोधक, अभ्यासक आहेत. यापूर्वी त्यांच्यावर गुन्हा दाखल असल्याची चुकीची माहिती आरोपीच्या वकिलांनी दिली आहे. याबद्दल कोरटकर याने सावंत यांच्या माफीचे लेखी पत्र न्यायालयात दाखल करावे, अशी मागणी ॲड. सरोदे यांनी केली. कोरटकर याने जामीन अर्जावरही वेगवेगळ्या सह्या केल्या आहेत. त्याच्या मनात मराठा समाजाबद्दल द्वेष असल्याचे पुढे आले आहे. घराला पोलिस संरक्षण असतानाही तो पळून गेला असल्याचे सरोदे यांनी सांगितले. न्यायालयात युक्तिवाद ऐकण्यासाठी गर्दी झाली होती. वकील, पोलीस, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयPoliceपोलिस