माणगाव येथे दाम्पत्याचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:21 IST2020-12-24T04:21:10+5:302020-12-24T04:21:10+5:30
माणगाव : माणगाव (ता. हातकणगंले) येथील एका दाम्पत्याने घरगुती वादातून रागाच्या भरात कीटकनाशक प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न ...

माणगाव येथे दाम्पत्याचा आत्महत्येचा प्रयत्न
माणगाव : माणगाव (ता. हातकणगंले) येथील एका दाम्पत्याने घरगुती वादातून रागाच्या भरात कीटकनाशक प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला. नामदेव बाबू जोग (वय ३५) व त्याची पत्नी जयश्री नामदेव जोग (३०) असे या दाम्पत्याची नावे असून त्यांना अत्यवस्थ स्थितीत कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
जोग हे घरगुती वादातून पत्नी, आईपासून विभक्त राहत होते. सोमवारी (दि. २१) सकाळी ते कामानिमित्त बाहेर गेले असता पत्नी व त्यांच्या आईची गॅस सिलिंडरच्या कारणावरून जोरात वादावादी झाली. कामावरून ते घरी परतताच त्यांना वादाची माहिती मिळाली. या वादाला कंटाळून, संतप्त होऊन त्यांनी व त्यांच्या पत्नीने विषारी कीटकनाशक प्राशन केले. या घटनेमुळे घरात घबराट पसरली. कुटुंबात गोंधळ उडाला. दोघांनाही अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तत्काळ उपचारासाठी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल केले. या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीमध्ये झाली आहे.