शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
3
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
4
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
5
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
6
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
7
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
8
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
9
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
10
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
11
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
12
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
13
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
14
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

देश प्रगतीसाठी धडपडणारा शिलेदार

By admin | Updated: November 17, 2015 00:26 IST

कृषिक्रांतीचे शिलेदार

कौटिल्याने अर्थशास्त्रविषयक विवेचनामध्ये प्रगत राज्याबाबत सत्यवचन लिहून ठेवले आहे. कौटिल्याच्या प्रगत राज्याच्या संकल्पनेप्रमाणे ज्या राज्यातील शेती उत्पादन पावसावर अवलंबून नसते ते राज्य प्रगत असते. हा विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी शाहू महाराजांसारख्या द्रष्ट्या राजाने प्रयत्न केलेले कोल्हापूरवासीयांना ज्ञात आहेच. तसेच आपले राज्य, देश प्रगत बनवण्यासाठी धडपडणारा शिलेदार म्हणजे विलासराव साळुंखे!सांगली जिल्ह्यातील रांजणी गावचे सैनिक सुभेदार बळवंतराव ऊर्फ नानासाहेब साळुंखे यांच्या ज्येष्ठ पुत्राच्या रूपात विलासरावांचा जन्म १८ फेब्रुवारी १९३७ रोजी झाला. बालपणापासूनच विलासराव हुशार विद्यार्थी म्हणून ओळखले जात. पुण्याच्या कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगमधून त्यांनी इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली. त्यांनी महाविद्यालयातील पडीक जागेत महिनाभरात सुंदर बगीचा फुलविला होता आणि हा बगीचा अनेक वर्ष साळुंखेची बाग म्हणून ओळखला जात होता.अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केल्यानंतर त्याच महाविद्यालयात शिक्षक म्हणून कार्य केले. विद्युत मोटार वायंडिंगचे वर्कशॉप काढले. पानशेत धरणफुटीमध्ये ते वाहून गेले. त्याच आपत्तीमुळे मोटार रिवायंडिंगची कामे मात्र मोठ्या प्रमाणात येऊ लागली. त्यांनी बळवंत इंजिनिअरिंग वर्कशॉप सुरू केले. याचेच पुढे क्युरेट इंजिनिअरिंगमध्ये रूपांतर झाले. त्याच काळात त्यांनी युरोप दौरा केला. क्युरेट इंजिनिअरिंग भरभराटीस येत असतानाच १९७२ चा दुष्काळ पडला. या दुष्काळामुळे निर्माण झालेले चित्र पाहून विलासराव अस्वस्थ झाले. लोक अन्न आणि पैशासाठी रस्त्यासाठी खडी फोडण्याचे काम करत. दुष्काळावर मात करण्यासाठी काय करता येईल, याचा ते विचार करू लागले. अशीच पाहणी करत असताना झेंडेवाडी येथे वेगळे चित्र दिसले. झेंडेवाडी येथील लोक आपल्या शेतात काम करत होते. त्यांनी अगोदरच्या वर्षी नालाबंडींगची कामे केली होती. त्यामुळे त्या गावाला दुष्काळाच्या झळा बसल्या नव्हत्या.ग्रामीण विकासासाठी शेतकऱ्याला बारा महिने पाणी उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे विलासरावांनी ओळखले. पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना रस्त्याऐवजी नालाबंडींगची कामे करावीत, असे सुचविले. मात्र, त्यांनी असमर्थता दर्शवली. लघुसिंचन विभागाने अपुऱ्या मनुष्यबळाचे कारण सांगितले. विलासरावांनी चुणचुणीत मुले निवडून त्यांना स्वखर्चाने प्रशिक्षण दिले. नालाबंडींगची कामे पुरंदर तालुक्यात सुरू केली. १९७३ मध्ये पडलेल्या पावसात याचे सकारात्मक परिणाम दिसून आले. पाणी प्रश्न समजून घेण्यासाठी ते इस्रायलला गेले. ग्रामगौरव प्रतिष्ठानची स्थापना केली. ग्रामीण विकासासाठी खेड्यात राहावयाचा निर्णय घेतला आणि नायगावला राहावयास गेले. गावात जागोजागी पाणी अडेल आणि ते गावातच मुरेल याची दक्षता घेतली. बांधावर झाडे लावून जमिनीची धूप थांबवली. सुरुवातीला केवळ एक चतुर्थांश जमिनीवर बागाईत शेती सुरू केली. यशस्वी प्रयोगाचा प्रसार करत नवे ज्ञान आणि प्रकल्प राबवताना ते ज्येष्ठांचे अनुभवही ऐकत. शेतीपूरक उद्योगांची माहिती शेतकऱ्यांना देऊन नवे उत्पन्नवाढीचे मार्ग दाखविले. नायगावात दुधाचा महापूर आला. उपलब्ध पाण्याच्या व्यवस्थित नियोजनाने काय होऊ शकते, हे नायगाव प्रकल्पाने दाखवून दिले. पुढे हा नायगाव पॅटर्न म्हणून ओळखला जाऊ लागला. शासनाने नायगावच्या धर्तीवर जलसंधारणाची कामे करावीत असे कळविले. त्यांना १९८६ साली जमनालाल बजाज पुरस्काराने सन्मानित केले गेले. या सर्जनशील व्यक्तिमत्त्वाने २३ एप्रिल २००२ रोजी इहलोकीचा निरोप घेतला.- डॉ. व्ही. एन. शिंदे, उपकुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.