शाहूवाडीत पाच फेऱ्यांत मतमोजणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:21 IST2021-01-18T04:21:46+5:302021-01-18T04:21:46+5:30

शाहूवाडी तालुक्यातील 41 ग्रामपंचायतींपैकी आठ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने ३३ ग्रामपंचायतींच्या पार पडलेल्या निवडणुकीची मतमोजणी तहसील कार्यालयाच्या जुन्या शासकीय गोदामात ...

Counting of votes in five rounds in Shahuwadi | शाहूवाडीत पाच फेऱ्यांत मतमोजणी

शाहूवाडीत पाच फेऱ्यांत मतमोजणी

शाहूवाडी तालुक्यातील 41 ग्रामपंचायतींपैकी आठ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने ३३ ग्रामपंचायतींच्या पार पडलेल्या निवडणुकीची मतमोजणी तहसील कार्यालयाच्या जुन्या शासकीय गोदामात सोमवार, दि.१८ जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता पाच फेऱ्यांत २१ टेबलवर होणार आहे .

दरम्यान, निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील गावांच्या ठिकाणीही पोलीस प्रशासनाने सतर्कता बाळगली असून, पोलीस निरीक्षक विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे

ग्रामपंचायतनिहाय फेऱ्या अशा

पहिली फेरी* -सकाळी ८.००ते ८.४५ पर्यंत-वाडीचरण,थेरगाव-सैदापूर,शिंपे, शिराळे तर्फे मलकापूर,परळे-कोदे-मुटकलवाडी,परळे निनाई-वाकोली,केर्ले-हुंबवली

दुसरी फेरी : मानोली,पेरिड-गाडेवाडी,मांजरे,नांदारी,मोसम,गजापूर-विशाळगड,परळी,कांडवण,थावडे

तिसरी फेरी - आंबा-तळवडे-चाळणवाडी, सोनवडे, नेर्ले, मोळावडे, ओकोली, पणुंद्रे-म्हाळसवडे,सवते

चौथी फेरी- शित्तूर तर्फे दारुण,शित्तूर तर्फे मलकापूर, सावर्डे बुद्रुक,शिरगाव,बुरंबाळ,पाटणे, नांदगाव

पाचवी फेरी - गोंडोली, पेंडाखळे,सोनुर्ले अशी मतमोजणी होणार आहे.

पेरिड-गाडेवाडी येथील एका जागेसाठी मतदानच झाले नसल्याने आता २१४ जागांसाठी ४४९ उमेदवार नशीब अजमावत आहेत.

.

Web Title: Counting of votes in five rounds in Shahuwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.