प्रभागातील कामासाठी नगरसेविकेचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:26 IST2021-02-16T04:26:16+5:302021-02-16T04:26:16+5:30

इचलकरंजी : येथील प्रभाग क्रमांक १८ मध्ये अनेक रस्त्याची दुरवस्था झाली आहे. याबाबत गेल्या दोन वर्षांपासून अनेकवेळा निवेदने देऊनही ...

Corporator's fast for ward work | प्रभागातील कामासाठी नगरसेविकेचे उपोषण

प्रभागातील कामासाठी नगरसेविकेचे उपोषण

इचलकरंजी : येथील प्रभाग क्रमांक १८ मध्ये अनेक रस्त्याची दुरवस्था झाली आहे. याबाबत गेल्या दोन वर्षांपासून अनेकवेळा निवेदने देऊनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या निषेधार्थ नगरसेविका दीपाली बेडक्याळे यांच्या नेतृत्वाखाली भागातील नागरिकांनी सोमवारी नगरपालिकेच्या दारात उपोषण केले. बुधवारपासून या कामास सुरुवात करून इतर प्रलंबित कामेही पूर्ण केली जातील, असे आश्वासन सभापती उदयसिंह पाटील यांनी दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा अलका स्वामी उपस्थित होत्या.

येथील प्रभाग क्रमांक १८ मध्ये रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेबाबत दीपाली यांनी वारंवार पालिकेकडे मागणी केली होती. तरीही पालिकेने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यांनी नागरिकांना गोळा करून सोमवारी पालिकेच्या दारात घोषणाबाजी करत ठिय्या मांडला. तीन वर्षांपूर्वी लेखी मागणी करूनही कोणतेही काम करण्यात आले नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी नगरसेवक प्रकाश मोरबाळे व सागर चाळके यांनीही आंदोलनाला पाठिंबा दिला. उपोषणास अण्णासाहेब शहापुरे, संजय बेडक्याळे, मंगेश कांबुरे यांच्यासह नागरिक बसले होते.

Web Title: Corporator's fast for ward work