शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

Coronavirus Unlock : शहरात उद्यापासून ‘जनता कर्फ्यू’, नागरिकांवर सक्ती नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 19:47 IST

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी कोल्हापूर शहरात  शु्क्रवारपासून दि. २१ सप्टेंबरपर्यंत स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन महापौर निलोफर आजरेकर यांनी केले आहे. या कर्फ्यूसाठी प्रशासनाची सक्ती असणार नाही.

ठळक मुद्देशहरात उद्यापासून ‘जनता कर्फ्यू’, नागरिकांवर सक्ती नाही राजारामपुरी, महाद्वार रोडवरील दुकाने राहणार सुरू

कोल्हापूर : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी कोल्हापूर शहरात  शु्क्रवारपासून दि. २१ सप्टेंबरपर्यंत स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन महापौर निलोफर आजरेकर यांनी केले आहे. या कर्फ्यूसाठी प्रशासनाची सक्ती असणार नाही.

कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स ॲन्ड इंडस्ट्रीच्या नेतृत्वाखाली विविध ३० क्षेत्रांतील व्यापारी, व्यावसायिकांनी दि. १६ सप्टेंबरपर्यंत कर्फ्यू पाळून दुकाने बंद ठेवणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, कोरोना रोखण्यासाठी कर्फ्यू पर्याय नसल्याचे सांगत राजारामपुरी, महाव्दार रोड परिसरातील व्यापारी, व्यावसायिकांनी दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

आपल्या व आपल्या कुटुंबाच्या काळजी व दक्षतेसाठी या कर्फ्यूचे पालन करावे. त्यामध्ये सामील होऊन आपली सर्व व्यापारी व व्यावसायिक आस्थापने बंद ठेवावीत, असे आवाहन कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी गुरूवारी केले.

दरम्यान, या कर्फ्यूमध्ये सहभागी होणार नसल्याचे राजारामपुरी व्यापारी असोसिएशनने बुधवारी जाहीर केले. त्यापाठोपाठ गुरूवारी महाव्दार रोड व्यापारी व रहिवासी संघानेही कर्फ्यूला विरोध करून दुकाने सुरू ठेव‌ण्याचा निर्णय जाहीर केला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा-बटाटा आणि भाजीपाला सौदे सुरू राहणार आहेत. शहरातील व्यापारी, व्यावसायिकांच्या परस्परविरोधी भूमिकेमुळे संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

रेडीमेड, क्लॉथ-गारमेंट्सची दुकाने राहणार सुरू

कोल्हापूर शहरातील रेडीमेड, क्लॉथ अँड गारमेंट‌्स डीलर्स असोसिएशनही जनता कर्फ्यूमध्ये सहभागी होणार नाही. या असोसिएशनने त्याबाबतचा निर्णय गुरुवारी घेतला आहे. शहरात रेडीमेड, क्लॉथ आणि गारमेंटची सुमारे ७०० दुकाने आहेत. त्यांतील ७० टक्के दुकाने भाडेतत्त्वावरील जागेत आहेत. त्यांमध्ये सुमारे साडेतीन हजार कामगार आहेत.लॉकडाऊनमुळे सुमारे ८० दिवस दुकाने बंद राहिली. आता पुन्हा दुकाने बंद ठेवल्यास व्यापारी संपून जातील. कामगारांची अडचण होईल. त्यामुळे आज, शुक्रवारपासून होणाऱ्या जनता कर्फ्यूमध्ये या सर्व व्यापाऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंगच्या सर्व नियमांचे पालन करून दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय असोसिएशनच्या बैठकीत घेतला आहे. यावेळी अजित मेहता, कमलाकर पोळ, विक्रम निसार, मुरली रोहिडा, प्रसाद नेवाळकर, कवन छेडा, गजानन पोवार, परेश मेढा, आदी उपस्थित होते.

या कर्फ्यूमध्ये हे राहणार सुरू

१) कृषी सेवा, औषध आणि दूध दुकाने२) अत्यावश्यक सेवा३) बँका४) राजारामपुरी, महाद्वार रोडवरील दुकाने५) बाजार समितीतील सौदे६) रिक्षासेवा७) पेट्रोलपंप

हे राहणार बंद

१) धान्य, मसाला, खाद्यतेल, किराण-भुसारी व्यापार२) ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स-इलेक्ट्रिकल, प्लायवूड, आदी विविध ३० क्षेत्रांतील व्यापार३) हॉटेल व्यवसाय४) बांधकाम व्यवसाय

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकkolhapurकोल्हापूर