Coronavirus Unlock : लक्ष्मीपुरी, कसबा बावडा आठवडा बाजार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 18:11 IST2020-06-26T18:10:19+5:302020-06-26T18:11:29+5:30
कोविड १९च्या संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिकेकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून, गर्दी होऊ नये म्हणून रविवारी होणारा लक्ष्मीपुरी व कसबा बावडा येथील आठवडा बाजार रविवारपासून पुढील आदेश होईतोपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

Coronavirus Unlock : लक्ष्मीपुरी, कसबा बावडा आठवडा बाजार बंद
कोल्हापूर : कोविड १९च्या संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिकेकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून, गर्दी होऊ नये म्हणून रविवारी होणारा लक्ष्मीपुरी व कसबा बावडा येथील आठवडा बाजार रविवारपासून पुढील आदेश होईतोपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
शहरातील नागरिकांनी आठवडा बाजाराच्या ठिकाणी भाजी खरेदी करण्यास गर्दी करू नये, असे आरोग्य विभागाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
शहरातील नागरिकांनी संचारबंदीचे तंतोतंत पालन करावे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, विनाकारण घराबाहेर पडून गर्दी करू नये; सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी असल्यास डॉक्टरांचा त्वरित सल्ला घ्यावा, असे आवाहन महापौर निलोफर आजरेकर व आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले आहे.