CoronaVirus : जिल्ह्यात १४ नवे रुग्ण पॉझीटिव्ह, एकूण ३९७ ने वाढला, शाहूवाडीत सर्वाधिक १२८
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 18:23 IST2020-05-27T17:13:28+5:302020-05-27T18:23:14+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात आज कोरोनाचे १४ नविन रुग्ण आढळले आहेत. यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह कोरोनाबाधितांचा आकडा ३९७ ने वाढला आहे.

CoronaVirus : जिल्ह्यात १४ नवे रुग्ण पॉझीटिव्ह, एकूण ३९७ ने वाढला, शाहूवाडीत सर्वाधिक १२८
कोल्हापूर : जिल्ह्यात आज कोरोनाचे १४ नविन रुग्ण आढळले आहेत. यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह कोरोनाबाधितांचा आकडा ३९७ ने वाढला आहे.
आज सकाळी ५८५ अहवालापैकी ५ अहवाल पॉझीटिव्ह आले तर ५२५ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये सिंधुदुर्गच्या ५५ अहवालाचा समावेश आहे. आज सकाळ पर्यंत जिल्ह्यात एकूण ३९७ पॉझीटिव्ह रुग्ण असून त्यामध्ये सर्वाधिक शाहूवाडीत १२८ रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.
आज सकाळपर्यत प्राप्त पॉझीटिव्ह अहवालामध्ये गडहिंग्लज येथील २, शाहूवाडी येथील ९, भुदरगड येथील १, सोलापूर येथील २ रुग्णांचा समावेश आहे.
आज अखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे
- आजरा- ३२, भुदरगड- ५०, चंदगड- २५, गडहिंग्लज-१५, गगनबावडा- ६, हातकणंगले- ४, कागल- ११, करवीर- ११, पन्हाळा- २०, राधानगरी- ४८, शाहूवाडी- १२८, शिरोळ- ५, नगरपरिषद क्षेत्र- १०, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-२० असे एकूण ३७७ आणि पुणे -१, सोलापूर-२, कर्नाटक-२ आणि आंध्रप्रदेश-१ इतर जिल्हा व राज्यातील पाच असे मिळून एकूण ३९१ रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.