CoronaVirus :नवे सहा रुग्ण, कोल्हापूर जिल्ह्यातील ४00 रुग्ण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 18:32 IST2020-06-05T18:30:03+5:302020-06-05T18:32:16+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात काल कोरोनाचे नवीन सहा रुग्ण आढळून आले असले तरी एकूण ४00 रुग्ण कोरोनमुक्त झाले आहेत. जिल्ह्यात एकुण २४७ कोरोनाबाधित रुग्ण असून काल दिवसभरात एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही.

CoronaVirus :नवे सहा रुग्ण, कोल्हापूर जिल्ह्यातील ४00 रुग्ण कोरोनामुक्त
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात काल कोरोनाचे नवीन सहा रुग्ण आढळून आले असले तरी एकूण ४00 रुग्ण कोरोनमुक्त झाले आहेत. जिल्ह्यात एकुण २४७ कोरोनाबाधित रुग्ण असून काल दिवसभरात एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही.
कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. काल एका दिवसात ३६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या सहा आहे. झाली आहे. आजअखेर ६५९ रूग्णांपैकी ४00 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- ५९, भुदरगड- ६७, चंदगड- ७५, गडहिंग्लज- ६७, गगनबावडा- ६, हातकणंगले- ६, कागल- ५५, करवीर- १४, पन्हाळा- २५, राधानगरी- ६३, शाहूवाडी- १६९, शिरोळ- ७, नगरपरिषद क्षेत्र- ११, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-२१ असे एकूण ६४५ आणि पुणे -१, सोलापूर-३, कर्नाटक-२, आंध्रप्रदेश-१ आणि मुंबई-१ असे इतर जिल्हा व राज्यातील आठ असे मिळून एकूण ६४५ रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
जिल्ह्यातील एकूण ६५९ रूग्णांपैकी ४00 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण ६ जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या २४७ इतकी आहे.