CoronaVirus :सार्वजनिक ठिकाणी थुंकलेबद्दल नऊजणांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 10:46 IST2020-06-09T10:44:56+5:302020-06-09T10:46:33+5:30

शहरातील सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबद्दल नऊ नागरिकांना महापालिकेने सोमवारी कारवाई करुन त्यांच्याकडून १३५० रुपयांचा दंड वसूल केला. सदरची कारवाई महापालिकेकडील आरोग्य विभाग ए /१ कार्यालयाकडून गांधी मैदान, निवृत्ती चौक व रंकाळा स्टँड या परिसरात करण्यात आली.

CoronaVirus: Nine people fined for spitting in public | CoronaVirus :सार्वजनिक ठिकाणी थुंकलेबद्दल नऊजणांना दंड

CoronaVirus :सार्वजनिक ठिकाणी थुंकलेबद्दल नऊजणांना दंड

ठळक मुद्देसार्वजनिक ठिकाणी थुंकलेबद्दल नऊजणांना दंड गांधी मैदान, निवृत्ती चौक. रंकाळा स्टँड परिसरात कारवाई

कोल्हापूर : शहरातील सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबद्दल नऊ नागरिकांना महापालिकेने सोमवारी कारवाई करुन त्यांच्याकडून १३५० रुपयांचा दंड वसूल केला. सदरची कारवाई महापालिकेकडील आरोग्य विभाग ए /१ कार्यालयाकडून गांधी मैदान, निवृत्ती चौक व रंकाळा स्टँड या परिसरात करण्यात आली.

ही कारवाई आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक ऋषिकेश सरनाईक, जुना राजवाडाचे पोलीस हवालदार दत्तात्रय शेलार, बाबूलाल कोकणी व कर्मचारी यांनी केली.

Web Title: CoronaVirus: Nine people fined for spitting in public