कोल्हापूर : विमान कंपन्यांनी जूनपासूनच्या सेवेसाठी आॅनलाईन तिकीट नोंदणी सुरू केली आहे. मात्र, केंद्र सरकारच्या आदेशानंतरच कोल्हापूरहून विमान सेवा सुरू करण्यात येईल, असे विमानतळ प्राधिकरणाचे संचालक कमल कटारिया यांनी गुरुवारी सांगितले.लॉकडाऊनमुळे देशांतर्गत विमानसेवा बंद आहे. मे महिन्यात लॉकडाऊन वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे अधिकत्तर विमानकंपन्यांनी जूनपासून सेवा सुरू होईल, असा अंदाज करून आॅनलाईन तिकीट नोंदणीचा प्रारंभ केला आहे. मात्र, केंद्र सरकारच्या आदेशानुसार विमान सेवेबाबत कार्यवाही केली जाणार असल्याचे कटारिया यांनी सांगितले.
CoronaVirus News Kolhapur: विमान कंपन्यांकडून जूनपासूनची तिकीट नोंदणी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 05:03 IST