शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
2
इराण-अमेरिका युद्धाची शक्यता? तेहरानच्या इशाऱ्यानंतर कतारमधील अमेरिकन हवाई तळ केले रिकामे
3
ट्रम्प यांच्या टॅरिफवर आज कोणताही निर्णय नाही, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी दुसऱ्यांदा पुढे ढकलली
4
Daryl Mitchell च्या शतकासह यंगची 'विल पॉवर'! टीम इंडियावर पलटवार करत न्यूझीलंडनं साधला बरोबरीचा डाव
5
Daryl Mitchell Hundred : डॅरिल मिचेलची कडक सेंच्युरी; किंग कोहलीच 'नंबर वन' स्थान धोक्यात!
6
अमेरिकेने केली इराणची कोंडी, चारही बाजूंनी घेरले; 'या' देशांमध्ये लष्करी तळ...
7
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
8
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
9
शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक; खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या, प्रचंड राडा
10
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
11
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
12
लहानपणीची गोंडस मुलगी आता झालीये सुपरहॉट, रेड बॅकलेस ड्रेसमध्ये सारा अर्जुनचा किलर लूक!
13
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
14
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
15
बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!
16
IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद
17
मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
18
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
19
Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल
20
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : कुटुंबनियोजन कार्यक्रमाला बसला कोरोनाचा झटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2020 07:36 IST

CoronaVirus News in Marathi and Live Updates : केंद्र सरकारने देशात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर अत्यावश्यक सेवेशिवाय इतर वस्तू मिळणे दुरापास्त झाले आहे. गर्भनिरोधक साधनांचा मोठा तुटवडा देशात जाणवत आहे.

- पोपट पवारकोल्हापूर : कोरोनाचा कुणाला कसा फटका बसला याचे वेगवेगळे किस्से आता बाहेर येत आहेत. उद्योजक, नोकरदार, मजुरांसह सर्वांना आर्थिक फटका बसला असला, तरी सरकारच्या कुटुंबनियोजन कार्यक्रमालाही त्याचा ‘जोर का झटका’ बसला आहे. लॉकडाऊन काळात दोन कोटी ५६ लाख जोडप्यांपर्यंत गर्भनिरोधके न पोहोचल्याने या कार्यक्रमाचे लक्ष्य २० टक्क्यांनी मागे राहील. २३ लाख महिलांची इच्छा नसताना गर्भधारणा होईल, आठ लाखांवर असुरक्षित गर्भपात होतील, असा निष्कर्ष दिल्लीतील फाउंडेशन फॉर रिप्रोडक्टिव हेल्थ सर्व्हिसेस इंडिया (एफआरएचएस) या संस्थेने काढला आहे.केंद्र सरकारने देशात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर अत्यावश्यक सेवेशिवाय इतर वस्तू मिळणे दुरापास्त झाले आहे. गर्भनिरोधक साधनांचा मोठा तुटवडा देशात जाणवत आहे. जर ही स्थिती सप्टेंबरपर्यंत पूर्वपदावर आली नाही तर देशातील अडीच कोटींपेक्षा अधिक दाम्पत्यांपर्यंत गर्भनिरोधके पोहोचणार नाहीत, परिणामी, २३ लाख महिला इच्छा नसताना गर्भवती राहण्याचा अंदाज ‘एफआरएचएस’ने वर्तविला आहे; शिवाय, लॉकडाऊनची स्थिती अशीच राहिली, तर गर्भपात करण्याची कोणतीच सुविधा उपलब्ध होणार नाही. परिणामी, इच्छा नसताना गर्भ राहिल्याने आठ लाखांपेक्षा अधिक महिला असुरक्षित गर्भपात करून घेतील, अशी भीती आहे.दरम्यान, कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी देशात मोठ्या प्रमाणात जनजागृती होत असली, तरी लॉकडाऊनमुळे सहा लाखांपेक्षा अधिक दाम्पत्यांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करता येणार नाहीत; शिवाय देशात सध्या कंडोमचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे.परिणामी, २३ लाख ९५ हजार महिलांना इच्छेविरोधात गर्भ ठेवावा लागणार आहे. किंवा त्यांची नकळत गर्भधारणा होऊ शकते. यामुळे देशात सहा लाख ७९ हजार ८६४ अतिरिक्त बाळांचा जन्म होणार आहे. यामुळे सरकारने सुरू केलेल्या कुटुंबनियोजन कार्यक्रमालाही ‘खो’ बसणार आहे. गर्भनिरोधक साधनांचा उपयोग न केल्याने १० लाखांपेक्षा अधिक अतिरिक्तगर्भपात होण्याची भीतीही ‘एफआरएचएस’ने व्यक्त केली आहे. यामध्ये आठ लाख ३४ हजार असुरक्षित गर्भपात, तर प्रसूती काळात दीड हजारांपेक्षा अधिक गर्भवतींचा मृत्यू होण्याचा धोका आहे.लॉकडाऊन उठल्यानंतर रुग्णालयांवर ताणलॉकडाऊन उठल्यानंतर वा शिथिल झाल्यानंतर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया आणि गर्भनिरोधक गोळ्यांची मोठ्या प्रमाणात मागणी होऊ शकते. एकाच वेळी मोठ्या प्रमाणात मागणी झाल्यास त्यांची ही मागणी पूर्ण करताना आरोग्य यंत्रणेवर ताण येण्याची शक्यता आहे.लॉकडाऊन काळात गर्भनिरोधक गोळ्यांची मागणी प्रचंड वाढली आहे. इच्छेविरुद्ध गर्भ राहिल्याने पुढील काळात असुरक्षित गर्भपातही मोठ्या प्रमाणात होऊ शकतात. सरकारी पातळीवरच यासाठी जनजागृती आवश्यक आहे.-डॉ. राजीव चव्हाण,स्त्रीरोगतज्ज्ञ, कोल्हापूर.

टॅग्स :FamilyपरिवारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस