CoronaVirus : कर्नाटकातील मंत्री म्हणतात.. पुढील महिन्यात वाढणार कोरोना रुग्णांची संख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 16:24 IST2020-06-10T16:22:36+5:302020-06-10T16:24:08+5:30

कर्नाटकात जुलै महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांनी हा कोरोना वाढीचा निष्कर्ष काढला असून त्याला सामोरे जाण्यासाठी कर्नाटक सरकार तयार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री के. सुधाकर यांनी चिक्कबळापूर येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

CoronaVirus: Minister in Karnataka says .. The number of Corona patients will increase next month | CoronaVirus : कर्नाटकातील मंत्री म्हणतात.. पुढील महिन्यात वाढणार कोरोना रुग्णांची संख्या

CoronaVirus : कर्नाटकातील मंत्री म्हणतात.. पुढील महिन्यात वाढणार कोरोना रुग्णांची संख्या

ठळक मुद्देकर्नाटकातील मंत्री म्हणतात.. पुढील महिन्यात वाढणार कोरोना रुग्णांची संख्याकर्नाटक सरकार तयार, तपासणीसाठी ७० प्रयोगशाळा सुरू

बेळगाव - कर्नाटकात जुलै महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांनी हा कोरोना वाढीचा निष्कर्ष काढला असून त्याला सामोरे जाण्यासाठी कर्नाटक सरकार तयार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री के. सुधाकर यांनी चिक्कबळापूर येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

अन्य देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ काही महिन्यात झाली, पण आपल्या देशात पाच महिने झाले तरी रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झालेली नाही किंवा लाट आलेली नाही. राज्यात करोना रुग्णांच्या तपासणीसाठी ७० प्रयोगशाळा सुरू करण्यात आल्या आहेत. आजवर चार लाख रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे असे मंत्री के. सुधाकर यांनी सांगितले.

 

Web Title: CoronaVirus: Minister in Karnataka says .. The number of Corona patients will increase next month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.