CoronaVirus Lockdown : शिरोली येथील मजुरांचा उत्तर प्रदेशाकडे जाण्यासाठी आक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 17:07 IST2020-05-14T17:05:49+5:302020-05-14T17:07:42+5:30

उत्तरप्रदेशला रेल्वे असल्याच्या गैरसमजातून शिरोली येथील हजारो मजूर गुरुवारी मुलाबाळांसह भर उन्हात कोल्हापुरातील रेल्वेस्थानकाच्या दिशेने चालत जात होते. यावेळी पोलिसांनी त्यांना तावडे हॉटेल, पुलाच्या परिसरातच बॅरेकड‌्स लावून अडविले.

CoronaVirus Lockdown: Workers cry to go to Uttar Pradesh | CoronaVirus Lockdown : शिरोली येथील मजुरांचा उत्तर प्रदेशाकडे जाण्यासाठी आक्रोश

CoronaVirus Lockdown : शिरोली येथील मजुरांचा उत्तर प्रदेशाकडे जाण्यासाठी आक्रोश

ठळक मुद्देहजारो मजूर गैरसमजातून रेल्वे स्टेशनकडे भर उन्हात चालत तावडे हॉटेल येथे पोलिसांनी अडवले

कोल्हापूर : उत्तरप्रदेशला रेल्वे असल्याच्या गैरसमजातून शिरोली येथील हजारो मजूर गुरुवारी मुलाबाळांसह भर उन्हात कोल्हापुरातील रेल्वेस्थानकाच्या दिशेने चालत जात होते. यावेळी पोलिसांनी त्यांना तावडे हॉटेल, पुलाच्या परिसरातच बॅरेकड‌्स लावून अडविले.

शिये येथील मजूर गेले. मग आम्हाला का पाठवत नाही? अशी त्यांनी भूमिका घेतली. जिल्हाधिकारी दौलत देसाइं, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी गुरुवारी मजुरांना तुमच्यासाठी रेल्वे नसल्याने तुम्ही माघारी जा, असे आवाहन केले. मात्र, मजुरांनी त्याला साफ नकार दिला. दोन तास त्यांनी ठिय्या मारला.

अखेर त्यांना, शुक्रवारी सायंकाळी रेल्वेने गावी पोहोचवले जाईल, असे आश्वासित केले. यानंतर सर्वांना मुस्कान लॉन आणि बुधले हॉल येथे तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले. यानंतर वातावरण शांत झाले.

 

Web Title: CoronaVirus Lockdown: Workers cry to go to Uttar Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.