शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
2
आता सभा घेऊन कोणाचे पोर कडेवर खेळवणार? अनिल परबांनी राज ठाकरेंना करून दिली आठवण
3
‘’उबाठा गटाची अवस्था ‘नाच गं घुमा, कशी मी नाचू’ अशी झालीय, मनसेची बोचरी टीका 
4
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
5
Breaking: सलमान खानवर गोळीबार प्रकरण; आरोपींपैकी एकाची पोलिस कोठडीत आत्महत्या
6
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठीतून राहुल, रायबरेलीतून प्रियंका, काय म्हणाल्या मनेका गांधी?
7
छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीवर उदय सामंताचा दावा; 'त्या' ड्राफ्टबाबत खळबळजनक खुलासा
8
Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी
9
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
10
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
11
सिंधुदुर्गात ठाकरे गटाचं बळ वाढणार, राणेंना आव्हान देणारा जुना शिवसैनिक घरवापसी करणार 
12
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
13
Fact Check: नेपाळ संसदेत पंतप्रधान मोदींवर झाली नाही टीका; जाणून घ्या व्हायरल Videoचे 'सत्य'
14
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
15
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
16
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
17
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
18
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
19
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
20
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'

CoronaVirus: कोल्हापुरात चक्क चांदीचा मास्क, ऑर्डरही येताहेत जोरात; जाणून घ्या किंमत!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 6:56 PM

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क ही जीवनावश्यक बाब बनली आहे. पण हा मास्क चांदीचा असेल तर.... आहे की नाही भन्नाट कल्पना. कोल्हापुरातील सराफ व्यावसायिक संदीप सांगावकर यांनी हा चांदीचा मास्क बनवला असून नियोजित वधू-वरांच्या कुटूंबियांकडून या मास्कला मागणी येत आहे.

ठळक मुद्देकोल्हापुरात चक्क चांदीचा मास्क,  सराफ व्यावसायिकाची भन्नाट कल्पनासराफ व्यावसायिक संदीप सांगावकर यांचा प्रयोग : वधु-वरांसाठी मागणी

इंदुमती गणेशकोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क ही जीवनावश्यक बाब बनली आहे. पण हा मास्क चांदीचा असेल तर.... आहे की नाही भन्नाट कल्पना. कोल्हापुरातील सराफ व्यावसायिक संदीप सांगावकर यांनी हा चांदीचा मास्क बनवला असून नियोजित वधू-वरांच्या कुटूंबियांकडून या मास्कला मागणी येत आहे.जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाने प्रत्येकाला नाका तोंडावर मास्क लावायला भाग पाडले आहे. बाजारात एन ९५ सह अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मास्क आले आहे. त्यात पुढचा प्रयोग करत गुजरी परिसरातील सराफ व्यावसायिक संदीप सांगावकर यांनी चक्क चांदीचा मास्क बनवला आहे. हा मास्क बनवण्यासाठी आठ दिवस लागले असून त्यासाठी ५० ग्रॅम चांदी वापरण्यात आली आहे. या एका मास्कची किंमत अडीच हजार रुपये इतकी आहे.या प्रयोगाबद्दल संदीप म्हणाले, लॉकडाऊनमुळे गेले दीड महिना घरी बसून होतो. अक्षय्यतृतियेचा मुहूर्तही तसाच गेला, लग्न सराईचे काही मुहूर्त शिल्लक आहेत तरी सध्याच्या परिस्थितीत ग्राहकांकडून मोठ्या अलंकारांची खरेदी केली जात नाही. त्यामुळे लग्न सोहळ्यात घालता येईल असा आणि कोरोनाशी संबंधित विषयावरच एखादी वस्तू बनवावी असा विचार डोक्यात आला आणि मास्कची कल्पना सुचली व लागलीच बनवायला सुरुवातही केली. 

आठ दिवसात खास वधू-वरांसाठी हा चांदीचा मास्क तयार झाला. या मास्कची माहिती समाज माध्यमावर व्हायरल झाल्यानंतर आता त्यासाठी मोठ्या प्रमाणात मागणीही सुरु झाली आहे.

हा मास्क बनवताना वधू-वर डोळ्यासमोर ठेवले होते. तसा तो कोणालाही वापरता येतो. मात्र तो प्रतिकात्मक आहे. मेटलचा असल्याने त्याचा आकार चेहऱ्यानुसार बदलत नाही. आजूबाजुला हवा खेळती राहते त्यामुळे दैनंदिन वापरासाठी कापडी मास्क अधिक सुरक्षित आहेत.संदीप सांगावकर, सराफ व्यावसायिक, कोल्हापूर 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरSilverचांदीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस