शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

CoronaVirus Lockdown : पुणे-मुंबईकरांबद्दलची लोकमतने मांडलेली भूमिका सामंजस्याची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 19:30 IST

कोरोनाकाळात कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या पुण्या-मुंबईतील लोकांबद्दल लोकमतने घेतलेली भूमिका समंजसपणाची आहे, अशी प्रतिक्रिया समाजाच्या विविध स्तरांवर गेले दोन दिवस व्यक्त झाली. ही बातमी कोल्हापूरसह पुणे-मुंबईतीलही लोकांच्या शेकडो ग्रुपवर सोशल मीडियातून प्रसारित झाली.

ठळक मुद्दे पुणे-मुंबईकरांबद्दलची लोकमतने मांडलेली भूमिका सामंजस्याचीसमाजातून उत्स्फूर्त प्रतिक्रिया : विलगीकरण केलेल्यांचीही तितकीच जबाबदारी

कोल्हापूर : कोरोनाकाळात कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या पुण्या-मुंबईतील लोकांबद्दल लोकमतने घेतलेली भूमिका समंजसपणाची आहे, अशी प्रतिक्रिया समाजाच्या विविध स्तरांवर गेले दोन दिवस व्यक्त झाली. ही बातमी कोल्हापूरसह पुणे-मुंबईतीलही लोकांच्या शेकडो ग्रुपवर सोशल मीडियातून प्रसारित झाली.

रेड झोनमधून आलेल्या लोकांकडून स्थानिक लोकांना संसर्ग होऊ नये या काळजीपोटीच त्यांच्याबाबत गावपातळीवर आकसाची भूमिका घेतली जात आहे. या लोकांनीही पुरेशी दक्षता बाळगणे, हातावर शिक्का असतानाही गावांतून फिरणे बंद करावे, अशी अपेक्षा व्यक्त झाली. मुंबईकर लोकांनी महापुरात केलेल्या मदतीचे व्हिडीओ या बातमीसोबत अनेकांनी प्रसारित केले.पुण्या-मुंबईतील माणूस तुमच्या कोणत्याही अडीअडचणीला धावून आला आहे; त्यामुळे त्याच्या ऋणातून उतराई होण्याची गावांना ही संधी आहे, या भावनेने या अडचणीकडे पाहिले पाहिजे. कोरोनाचे संकट आज ना उद्या दूर होईल किंवा त्याला सोबत घेऊनच जगावे लागेल. कोणत्याही अडचणीच्या काळात कोण कुणाशी कसे वागला, याची नोंद मनात फार खोलवर होते हे लक्षात घेऊन व्यवहार होण्याची गरज आहे.

आतापर्यंत शाहूवाडी, आजरा, भुदरगड, गडहिंग्लज, चंदगड, राधानगरी या तालुक्यांत रेड झोनमधून मोठ्या संख्येने लोक आले आहेत. आता येत्या मंगळवार (दि. २६)पासूनही थांबलेले लोक येणार आहेत. त्यामुळे हा प्रश्न नव्याने चर्चेत येणार आहे. तुम्ही आम्हांला हवे आहातच; पण कुटुंब, परिवार आणि आपला गाव कोरोनाच्या संसर्गापासून वाचला पाहिजे, यासाठीही तुमचीही जबाबदारी म्हणून काही दिवसांसाठी अंतर ठेवूया, आपलीच लहान मुले, वयोवृद्ध आईवडील घरोघरी आहेत. त्यांची काळजी घेऊया.

येणाऱ्या लोकांनी रीतसर परवानगी घेऊन तपासणी करून यावे. ग्रामस्थांनी त्यांचे संस्थात्मक किंवा घरी विलगीकरण करावे. त्यांनी गावाला समजून घ्यावे व गावाने त्यांना आधार द्यावा म्हणजे एकमेकांत संवादाचा पूल तयार होईल, अशी भावना व्यक्त झाली. गावे मतांसाठी, मदतीसाठी त्यांना इकडून गाड्या पाठवून आणतात आणि आता मात्र त्यांची दारात लागलेली गाडीही तुम्हांला का सहन होत नाही, असा प्रश्नही यानिमित्ताने पुढे आला आहे.

तुम्ही संकटात असता तेव्हा आपले लोक कसे वागतात हे जास्त महत्त्वाचे असते. गावांनी सामंजस्याची भूमिका घेण्यास प्रवृत्त करणारे लेखन झाले.- शकील म्हालदार, बाळासाहेब फरासगगनबावडा

मुंबईतील नागरिकांबाबत अशी स्पष्ट भूमिका घेणे आवश्यक होते. समाजाच्या डोळ्यांत अंजन घालण्याचे काम या वृत्तामुळे झाले.- डॉ. सतीश पत्कीप्रसिद्ध प्रसूतिशास्त्र तज्ज्ञ

मुंबईकर हे मूळचे कोल्हापूरकरच आहेत, ही भूमिका अत्यंत सामंजसपणाची व शहाणपणाची आहे. आपल्याच माणसांबद्दल निर्माण झालेली कटुता त्यामुळे कमी होण्यास मदत होईल.- कौस्तुभ नाबरजाहिरात व्यावसायिक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरMumbaiमुंबई