CoronaVirus Lockdown : बेळगावातील आकडा वाढला, बाधित रुग्ण सदाशिवनगरातील?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 15:59 IST2020-05-14T15:58:25+5:302020-05-14T15:59:51+5:30
दिलासादायक तीन दिवसानंतर बेळगावातील कोरोना पोजझिटिव्ह रुग्णांचा आकडा गुरुवारी वाढला आहे. गेल्या 10 मे रोजी अजमेर कनेक्शनचे 22 रुग्ण आढळल्यानंतर 85 वरून जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा शंभरी पार करत 107 वर पोहोचला होता. त्यानंतर आज गुरुवारी 14 रोजी म्हणजे तीन दिवसांनी हा आकडा वाढला असून तो आता 108 इतका झाला आहे.

CoronaVirus Lockdown : बेळगावातील आकडा वाढला, बाधित रुग्ण सदाशिवनगरातील?
बेळगाव : दिलासादायक तीन दिवसानंतर बेळगावातील कोरोना पोजझिटिव्ह रुग्णांचा आकडा गुरुवारी वाढला आहे. गेल्या 10 मे रोजी अजमेर कनेक्शनचे 22 रुग्ण आढळल्यानंतर 85 वरून जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा शंभरी पार करत 107 वर पोहोचला होता. त्यानंतर आज गुरुवारी 14 रोजी म्हणजे तीन दिवसांनी हा आकडा वाढला असून तो आता 108 इतका झाला आहे.
बेळगाव शहरातील सदाशिवनगर भागातील पी - 974 या क्रमांकाच्या 27 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. सदर महिला मुंबई रिटर्न असून ती सदाशिवनगर येथील एका मोठ्या घराण्यातील असल्याचे समजते. त्यामुळे आता या घरातील सर्वांचेच कॉरन्टाईन केले जाणार आहे.
या महिलेच्या स्वरूपात शहरात पुन्हा कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे जिल्हा प्रशासन व आरोग्य खाते अत्यंत सतर्क झाले आहे. त्या अनुषंगाने सदाशिवनगरला "कंटेनमेंट झोन" म्हणून घोषित केले जाण्याची शक्यता आहे.