शहरं
Join us  
Trending Stories
1
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
2
पुतिन यांनीच फोडला 'बॉम्ब'! तेल खरेदी करण्यावरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
3
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
4
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
5
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
6
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
7
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
8
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
9
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
10
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
11
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
12
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
13
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
14
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
15
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
16
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
17
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
18
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
19
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
20
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक

CoronaVirus Lockdown : भाजीपाला खरेदी परवान्यासाठी बाजार समिती रांग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 10:49 IST

कोल्हापूर बाजार समिती समितीतून भाजीपाला खरेदीसाठी लागणारा परवाना मिळविण्यासाठी धडपड सुरू केली आहे. त्यासाठी गेली आठवडाभर समितीच्या मुख्य कार्यालय आवारात विक्रेत्यांच्या रांगा लागलेल्या पाहावयास मिळतात.

ठळक मुद्देभाजीपाला खरेदी परवान्यासाठी बाजार समिती रांगलॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद पडलेले वळले भाजीपाला विक्रीकडे

कोल्हापूर : गेली महिनाभर सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे हातावरील पोट असणारे व्यावसायिक व एमआयडीसीमधील कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. हे सर्वजण भाजीपाला विक्रीकडे वळले असून कोल्हापूर बाजार समिती समितीतून भाजीपाला खरेदीसाठी लागणारा परवाना मिळविण्यासाठी धडपड सुरू केली आहे. त्यासाठी गेली आठवडाभर समितीच्या मुख्य कार्यालय आवारात विक्रेत्यांच्या रांगा लागलेल्या पाहावयास मिळतात.‘कोराना’मुळे सगळी यंत्रणा कोलमडून पडली आहे. खरे हाल ज्यांचे हातावर पोट आहे, त्यांचे होत आहे. गेली महिनाभर हाताला काम नसल्याने सगळे सैरभैर झाले आहेत. लॉकडाऊनच्या काळात किराणा, भाजीपाला व फळांची विक्री एवढेच व्यवसाय सुरू आहेत.

त्यामध्ये सगळ्यास स्वस्त व चार पैसे मिळवून देणारा म्हणजे भाजीपाला विक्री आहे. त्यामुळे एमआयडीसीतील कामगार, रिक्षाचालकांसह इतर छोटे-छोटे व्यवसाय करणारे सर्वजण भाजीपाला विक्रीकडे वळले आहेत.बाजार समितीची परवानगी असल्याशिवाय तेथून भाजीपाल्याची खरेदी-विक्री करता येत नाही. यासाठी बाजार समितीकडे परवानगी मागणीसाठी सध्या रांगा लागलेल्या दिसतात. मंगळवारी समितीच्या मुख्य कार्यालय आवारात किमान अर्धा किलोमीटरची रांग लागली होती. कागदपत्रांची पूर्तता करून तातडीने समितीच्यावतीने त्यांना परवानगी दिली जात आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याvegetableभाज्याkolhapurकोल्हापूरMarket Yardमार्केट यार्ड