शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
4
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
5
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
6
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
7
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
8
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
9
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
10
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
11
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
12
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
13
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
14
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
15
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
16
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
17
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
18
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
19
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
20
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...

CoronaVirus Lockdown : कोरोनाचे संकट दूर होऊ दे... ईदला मुस्लिम बांधवांनी केली दुवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 17:21 IST

जगावर आलेले कोरोनाचे संकट दूर होऊ दे, या विषाणूवर लवकरात लवकर औषधे यावीत, कोरोनाग्रस्त रुग्ण बरे व्हावेत, अशी दुवा करत सोमवारी मुस्लिम बांधवांनी रमजान ईद साजरी केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रथमच मुस्लिम बांधवांनी घरातच नमाज पठण करत शासनाच्या निर्देशाचे पालन केले. संकट असले तरी ईदच्या सोहळ्यातील उत्साह तसूभरही कमी झाला नाही.

ठळक मुद्देकोरोनाचे संकट दूर होऊ दे रमजान ईदला मुस्लिम बांधवांनी केली दुवा

कोल्हापूर : जगावर आलेले कोरोनाचे संकट दूर होऊ दे, या विषाणूवर लवकरात लवकर औषधे यावीत, कोरोनाग्रस्त रुग्ण बरे व्हावेत, अशी दुवा करत सोमवारी मुस्लिम बांधवांनी रमजान ईद साजरी केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रथमच मुस्लिम बांधवांनी घरातच नमाज पठण करत शासनाच्या निर्देशाचे पालन केले. संकट असले तरी ईदच्या सोहळ्यातील उत्साह तसूभरही कमी झाला नाही.मुस्लिम बांधवांचा रमजान ईद हा सर्वात मोठा सण असतो. महिनाभर कडक उपवास केल्यानंतर यादिवशी उपवास सोडले जातात. ईदच्या दिवशी शहरातील विविध मस्जिदमध्ये सामूहिक नमाज पठण केले जाते. समाजबांधवांसह अन्य धर्मिय मित्र परिवारालाही यादिवशी शीरखुर्मा पिण्यासाठी आमंत्रित केले जाते.यंदा मात्र कोरोनाने या सणाचा आनंदही हिरावून घेतला. सामूहिक संसर्ग टाळण्यासाठी शासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन करत मुस्लिम बांधवांनी आपल्या घरातच नमाज पठण केले. दसरा चौकातील मुस्लिम बोर्डिंगच्या मैदानावर केवळ चारजणांनी नमाज पठण केले.

मुफ्ती इर्शाद कुन्नुरे यांनी खुदबा व नमाज पठण केले. यावेळी त्यांनी जगभरातून कोरोना नष्ट होऊ दे, या आजारावर लवकर औषध मिळू दे, कोरोना झालेले नागरिक लवकर या आजारातून बरे होऊ देत, तसेच विश्वशांतीसाठी प्रार्थना केली.यावेळी बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, प्रशासक कादर मलबारी उपस्थित होते. दरम्यान, शाहू छत्रपती, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, ॲड. गुलाबराव घोरपडे यांनी दूरध्वनीवरून ईदच्या शुभेच्छा दिल्या. दरवर्षी बोर्डिंगमध्ये शीरखुर्मा बनविला जातो; यंदा मात्र हा बेत टाळण्यात आला.घराघरात अत्यंत साधेपणाने सण साजरा करण्यात आला. लहान मुलांमध्ये सणाचा उत्साह होता. यासह शहरातील कसाब मस्जिद, बडी मस्जिद, बागल चौक कब्रस्तान, निहाल पैलवान, घुडणपीर, बाबूजमाल, सदर बझार, शाहूपुरी थोरली मस्जिद, नंगीवली, लाईन बझार, बावडा यासह शहरातील विविध मस्जिदमध्ये मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत नमाज पठण करण्यात आले. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRamadanरमजानkolhapurकोल्हापूरMuslimमुस्लीम