शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

CoronaVirus Lockdown : सहा लाख ४३ हजार ९६१ नागरिकांची दुसऱ्यांदा आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 16:24 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने शहरात सर्वेक्षण मोहीम सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. या दुसऱ्या टप्प्यामध्ये एक लाख ४५ हजार १०२ घरांचे सर्वेक्षण केले असून, यामध्ये सहा लाख ४३ हजार ९६१ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देसहा लाख ४३ हजार ९६१ नागरिकांची दुसऱ्यांदा आरोग्य तपासणी दुसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षण पूर्ण : एक लाख ४५ हजार १०२ घरांचे सर्वेक्षण

 कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने शहरात सर्वेक्षण मोहीम सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. या दुसऱ्या टप्प्यामध्ये एक लाख ४५ हजार १०२ घरांचे सर्वेक्षण केले असून, यामध्ये सहा लाख ४३ हजार ९६१ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.पहिल्या टप्प्याची सुरुवात १८ मार्चपासून सुरू करण्यात आलेले आहे. यामध्ये एक लाख ४४ हजार ३१९ घरांचे सर्व्हेक्षण झाले असून यामध्ये सहा लाख २८ हजार ५३२ नागरिकांची तपासणी केली.

महापालिकेच्या ११ नागरी आरोग्य केंद्राकडील कर्मचारी काम करीत आहेत. दुसऱ्या टप्प्यातील गुरुवारी ५ हजार ६६५ घरांचे व २५ हजार ५०० लोकांचे सर्वेक्षण झाले.

यामध्ये कदमवाडी, कावळा नाका, कारंडे मळा, जाधववाडी, टेंबलाईवाडी, विक्रमनगर, टाकाळा, रुईकर कॉलनी, राजीव गांधी वसाहत, बाजार गेट, शुक्रवार पेठ, बुधवार पेठ, तोरस्कर चौक, पंचगंगा तालीम, दुधाळी, रंकाळा स्टँड, राजाराम चौक, मरगाई गल्ली, विजयनगर, संभाजीनगर, सरनाईक कॉलनी, साळोखेनगर, गणेश कॉलनी, बापूरामनगर, देवकर पाणंद, प्रथमेशनगर, आपटेनगर, कनाननगर, शिवाजी पार्क, शनिवार पेठ, शाहूपुरी, जुना बुधवार पेठ, कामगार चाळ, जवाहरनगर, मंगळवार पेठ, प्रतिभानगर, यादवनगर, शाहूनगर, शास्त्रीनगर, शाहू मिल, अंबाई टँक, लक्षतीर्थ वसाहत, नाना पाटीलनगर, फुलेवाडी या ठिकाणी गुरुवारी (दि. १४) सर्वेक्षण केले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय