CoronaVirus Lockdown : पाच हजार ४४८ नागरिक अलगीकरण कक्षातून घरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 16:24 IST2020-06-06T16:22:48+5:302020-06-06T16:24:37+5:30
कोल्हापूर महापालिकेने स्थापन केलेल्या अलगीकरण कक्षांतून क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण करून तब्बल पाच हजार ४४८ नागरिक घरी गेले आहेत. दोन महिन्यांमध्ये तब्बल सहा हजार २७२ नागरिक येथे आले होते. अलगीकरण कक्षाची केंद्रेही कमी करण्यात आली आहेत. सध्या केवळ ८२४ नागरिक येथे आहेत.

CoronaVirus Lockdown : पाच हजार ४४८ नागरिक अलगीकरण कक्षातून घरी
कोल्हापूर : महापालिकेने स्थापन केलेल्या अलगीकरण कक्षांतून क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण करून तब्बल पाच हजार ४४८ नागरिक घरी गेले आहेत. दोन महिन्यांमध्ये तब्बल सहा हजार २७२ नागरिक येथे आले होते. अलगीकरण कक्षाची केंद्रेही कमी करण्यात आली आहेत. सध्या केवळ ८२४ नागरिक येथे आहेत.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासनाकडून युद्धपातळीवर उपाययोजना केल्या जात आहेत. यामुळेच शहरामध्ये समूह संसर्ग होऊ शकलेला नाही. परराज्यांतून तसेच परजिल्ह्यांतून कोल्हापुरात येणाऱ्या नागरिकांना अलगीकरण कक्षात ठेवण्यात येते.
२५ मार्चपासून अलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली. १४ दिवसांचा कालावधी पूर्ण केल्यानंतर येथील नागरिकांना घरी सोडले जाते. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर रेड झोन पुणे, मुंबई येथील नागरिक मोठ्या संख्येने कोल्हापुरात आले. त्यामुळे अलगीकरण कक्षांची संख्या वाढवण्यात आली.
केंद्रे सहावरून २१ पर्यंत वाढविण्यात आली होती. महापालिका, जिल्हा प्रशासन, सामाजिक संघटनांकडून त्यांना सुविधा पुरविण्यात येत आहेत. सध्या अलगीकरण कक्षात येणाऱ्यांचे प्रमाण पूर्वीपेक्षा कमी होत असून क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण करून घरी जाणाऱ्यांची संंख्या वाढत आहे.
- अलगीकरण कक्षात आलेले एकूण नागरिक - ६ हजार २७२
- क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण होऊन घरी गेलेले नागरिक - ५ हजार ४४८
- सध्या असणारे नागरिक - ८२४
- सेंटर संख्या - १४