CoronaVirus Lockdown : घरफाळ्यातून महापालिकेच्या तिजोरीत ५३ लाखांची कमाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 16:38 IST2020-05-30T16:36:46+5:302020-05-30T16:38:43+5:30
सहा टक्के सवलत योजनेमुळे घरफाळा जमा करण्यास मिळकतधारकांकडून प्रतिसाद मिळत आहे. शुक्रवारी दिवसभरात ५३ लाख २० हजार रुपयांचा घरफाळा जमा झाला आहे.

CoronaVirus Lockdown : घरफाळ्यातून महापालिकेच्या तिजोरीत ५३ लाखांची कमाई
कोल्हापूर : सहा टक्के सवलत योजनेमुळे घरफाळा जमा करण्यास मिळकतधारकांकडून प्रतिसाद मिळत आहे. शुक्रवारी दिवसभरात ५३ लाख २० हजार रुपयांचा घरफाळा जमा झाला आहे.
घरफाळा बिले महानगरपालिका संकेतस्थळावर ऑनलाईन पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. शुक्रवारी दिवसभरात नागरी सुविधा केंद्रावर लोकांनी रांग लावून सुमारे ४६ लाख १२ हजार इतकी रक्कम जमा केली असून, ऑनलाइर्नद्वारे सात लाख आठ हजार रुपये जमा झाले आहेत.
पत्राने पाठविली सवलत योजनेची माहिती
घरफाळा विभागांकडून नियमित वेळेत कर भरणा करणाऱ्यांना सहा टक्के सवलत योजना आणली आहे. या योजनेची माहिती मिळकतधारकांना होण्यासाठी स्वतंत्रपणे पत्रेही पाठविली आहे. त्यामुळेही घरफाळा जमा करण्यासाठी गर्दी होत आहे.