शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

CoronaVirus Lockdown : राज्यातील पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाला मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 13:34 IST

राज्य शासनाने महाराष्ट्र राज्यात पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. त्याकरिता किमान ३५० ते ४०० एकर जागा एकाच ठिकाणी शोधण्याचे काम सुरू झाले आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर या कामाला गती येणार आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा, आदी ठिकाणी जागेची पाहणी केली जाणार आहे.

ठळक मुद्देराज्यातील पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाला मंजुरीकोल्हापूरसह पुणे, सातारा येथे जागेचा शोध सुरू; समिती स्थापन

सचिन भोसले कोल्हापूर : राज्य शासनाने महाराष्ट्र राज्यात पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. त्याकरिता किमान ३५० ते ४०० एकर जागा एकाच ठिकाणी शोधण्याचे काम सुरू झाले आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर या कामाला गती येणार आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा, आदी ठिकाणी जागेची पाहणी केली जाणार आहे.देशाच्या प्रगतीत क्रीडा हा राष्ट्राचा मानबिंदू मानून, आंतरराष्ट्रीय संस्थांनी राष्ट्राच्या विकासाची काही नवीन मानके निश्चित केली आहेत. त्यांपैकी मानवी विकास निर्देशांकांनुसार राज्यात पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापण्याच्या हालचालींना वेग आला आहे.राज्य शासनातर्फे पशुसंवर्धन, दुग्धविकास व क्रीडामंत्री सुनील केदार यांच्या उपस्थितीत २ मार्च २०२० रोजी बैठक झाली. त्यात मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विजय खोले, शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, डॉ. अनिल कर्णिक, डॉ. विजय तायडे, आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू नीलेश कुलकर्णी, आदी नऊ तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे.या विद्यापीठासाठी एकूण ३५० ते ४०० एकर इतकी जागा एकाच ठिकाणी हवी आहे. त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी औरंगाबाद येथे जागेची पाहणी केली. मात्र ती पसंत पडली नाही. त्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे काम काहीअंशी थांबले असून, ते लॉकडाऊननंतर सुरू होणार आहे. त्यामुळे लॉकडाऊननंतर पुणे, सातारा, कोल्हापूर, आदी ठिकाणी जागेची पाहणी केली जाणार आहे.देशातील अन्य क्रीडा विद्यापीठेमहाराजा भूपिंदरसिंग क्रीडा विद्यापीठ पंजाब (पतियाळा), तमिळनाडू फिजिकल एज्युकेशन अ‍ॅँड स्पोर्टस युनिव्हर्सिटी (चेन्नई), स्वर्णीम गुजराथ स्पोर्टस युनिव्हर्सिटी (वडोदरा, गांधीनगर), लक्ष्मीबाई नॅशनल इन्स्टिट्यूट अ‍ॅँड फिजिकल एज्युकेशन (ग्वाल्हेर) व युनिव्हर्सिटी, राजस्थान स्पोर्टस विद्यापीठ, केंद्रीय राष्ट्रीय खेल विद्यापीठ (मणिपाल) यांचा समावेश आहे.या विद्यापीठांत काय शिक्षण मिळणार क्रीडाशास्त्र, पदवी, पदव्युत्तर, आदी खेळांत जखमी होण्याचे प्रमाण अधिक असल्याने त्यावरील उपचार, क्रीडा वैद्यकीय संशोधन, विविध खेळांसंबंधी तंत्रशुद्ध माहितीसाठी तज्ज्ञ, पुस्तके, ग्रंथालय, खेळ संशोधन विभाग, विविध खेळांसंबंधी विभाग, विविध खेळांची मैदाने, आदींचा समावेश असणार आहे.

राज्यात क्रीडा विद्यापीठाची आवश्यकता होती. ती उणीव राज्यातील पहिले क्रीडा विद्यापीठ स्थापून भरून निघेल.- डॉ. चंद्रशेखर साखरे, जिल्हा क्रीडाधिकारी, कोल्हापूर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर