शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
4
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
7
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
8
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
9
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
10
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
11
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
12
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
13
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

CoronaVirus Lockdown :रियाज, वाचन, लेखन, नृत्याराधना-विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा दिनक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2020 2:16 PM

कोरोनातील संचारबंदीमुळे वेगाने हातून निसटत जाणाऱ्या आयुष्याला अचानक ब्रेक लागला. धावताना अनेक गोष्टी करायच्या राहून जातात; पण या सक्तीच्या विश्रांतीने सर्वांचाच चाकोरीबद्ध दिनक्रम बदलला... अभिनेते, संगीत, गायन, वादन, नृत्य, साहित्य अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांनीही या फावल्या वेळेचा उपयोग आपले छंद पूर्ण करण्यासाठी केला आहे.

ठळक मुद्देरियाज, वाचन, लेखन, नृत्याराधनाविविध क्षेत्रांतील मान्यवरांचा दिनक्रम

इंदुमती गणेशकोल्हापूर : कोरोनातील संचारबंदीमुळे वेगाने हातून निसटत जाणाऱ्या आयुष्याला अचानक ब्रेक लागला. धावताना अनेक गोष्टी करायच्या राहून जातात; पण या सक्तीच्या विश्रांतीने सर्वांचाच चाकोरीबद्ध दिनक्रम बदलला... अभिनेते, संगीत, गायन, वादन, नृत्य, साहित्य अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांनीही या फावल्या वेळेचा उपयोग आपले छंद पूर्ण करण्यासाठी केला आहे.सर्वसामान्य दैनंदिन जीवनात एरवी सगळ्यांनाच घराबाहेर पडून आपापल्या कामधंद्यांत लक्ष घालावे लागत असल्याने काही गोष्टी करायच्या इच्छा राहून जातात. छंद मागे पडत जातात; पण सध्या कोरोनामुळे सगळ्यांनाच सक्तीने घरी बसावे लागल्याने आता वेळच वेळ आहे. या वेळेचा सदुपयोग करीत अनेकांनी आपला दिनक्रम बदलला आहे. नियोजनामधील सगळ्या गोष्टी, इच्छा आणि छंद पूर्ण करून घेतले जात आहेत. अशाच विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा संचारबंदीच्या काळातील दिनक्रमाचा घेतलेला हा आढावा.संगीतात रममाण होतो... : विनोद डिग्रजकरसंचारबंदीमुळे संगीताचा रियाज करायला आता वेळच वेळ मिळाला आहे. सकाळी प्रसन्न शांतता मिळते. त्यावेळी ओंकार साधना, श्वसन आणि आवाजाचे व्यायाम करतो. कुटुंबीयांसोबत चहा-नाष्टा झाला की, वेगवेगळे राग, बंदिशी, पंडितजींच्या रचना यांचा रियाज करतो. संग्रहातील बंदिशी ऐकतो. सध्या बाहेर पडायलाही बंदी असल्याने मुलांना शिकविताही येत नाही; त्यामुळे सगळा वेळ मी संगीतासाठी आणि त्यातच रममाण होतो.- पं. विनोद डिग्रजकर, शास्त्रीय गायकस्वत:ला सोबतकाही दिवसांपूर्वीपर्यंत मी एकाच वेळी दोन मालिकांचे चित्रीकरण करीत होतो; त्यामुळे अजिबात वेळ नव्हता. आता मात्र कोल्हापुरातच ही सक्तीची सुट्टी चित्रपट पाहणे, वाचन, स्क्रीन प्ले, शॉर्ट फिल्मचे लेखन यांत घालवीत आहे. घरातली कामे मी, पत्नी, मुलगा आणि मुलीने वाटून घेतली आहेत; त्यामुळे सध्या मी गृहकर्तव्यदक्ष होण्याचे प्रशिक्षण घेत आहे. स्वयंपाकापासून ते झाडलोट, फरशी पुसणे, कपडे, भांडी घासणे अशी सगळी कामे मी सध्या करतोय. संध्याकाळी गच्चीवर ५० मिनिटे वॉक घेतो. स्वत:साठी वेळ देतो. स्वत:ला जाणून घेतो.- स्वप्निल राजशेखर (अभिनेता)नृत्याचे आॅनलाईन धडेमाझ्या रुटिनला एक शिस्त लावावी, ही इच्छा आता मी पूर्ण करीत आहे. पहाटे चारला उठते. योगा, प्राणायाम, मेडिटेशन, व्यायाम करते. सध्या नृत्याचा क्लास बंद असल्याने चहा-नाष्टा झाला क ी विद्यार्थिनींनी आॅनलाईन नृत्याचे धडे देते. परीक्षेच्या दृष्टीने त्यांची तयारी करून घेत आहे. मला स्वयंपाक बनवायलाही आवडतो; त्यामुळे रोज पदार्थांचे वेगवेगळे प्रयोग करते. चित्रकला शिकत आहे. शिवाय चित्रपट बघते, वाचन करते. आॅडिओ बुक्स ऐकते. अशा रीतीने दिवस सगळा आवडीच्या गोष्टी करण्यात घालविते.- संयोगिता पाटील (भरतनाट्यम् नृत्यांगना)सध्या पूर्ण वेळ घरात थांबावे लागत असल्याने जीवनशैली बदलली आहे. अनेक ठिकाणांहून आलेल्या ग्रंथांचे वाचन व त्यावरील लेखन सुरू आहे. कुटुंबातील कामाच्या मदतीचा नवा अनुभवही मिळत आहे. कुटुंबातील विविध विषयांवरील गप्पा, चर्चांनी कौटुंबिक स्नेहभाव वृद्धिंगत करण्याबरोबर विचार, भावना भागीदारीची वेगळी अनुभूती मिळत आहे. काही दुर्मीळ चित्रपट व कलावंतांच्या मुलाखतीही पाहत आहे. मित्रांशी फोनवरून संवाद होतो. या शांतताकाळात आपल्या मन:शक्तीला सकारात्मक आणि आपल्या आवडीच्या निर्माणकार्याला वेळ देण्याचे समाधान लाभत आहे.प्रा. रणधीर शिंदे (साहित्यिक) 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdanceनृत्यartकलाkolhapurकोल्हापूर