CoronaVirus in kolhapur : कोल्हापूरात आणखीन 3 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 10:39 IST2020-05-09T10:38:26+5:302020-05-09T10:39:41+5:30
जिल्हा कोरोनामुक्तीच्या दिशेने जात असतानाच एकाच दिवशी आणखी 3 कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.शुक्रवारी मध्यरात्री एक वाजता त्यांचा तपासणी अहवाल आला आहे.

CoronaVirus in kolhapur : कोल्हापूरात आणखीन 3 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
कोल्हापूर : जिल्हा कोरोनामुक्तीच्या दिशेने जात असतानाच एकाच दिवशी आणखी 3 कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. शुक्रवारी मध्यरात्री एक वाजता त्यांचा तपासणी अहवाल आला आहे.
तीनही रुग्ण जिल्ह्यातल्या आजरा आणि चंदगड तालुक्यातील आहेत. त्यात आजरा येथील 1 महिला आणि 1 पुरुष तर, चंदगडच्या एका पुरुषाचा अशा एकूण 3 रुग्णांचा समावेश आहे.
एकाच दिवशी 3 कोरोनाग्रस्त सापडल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. त्यांच्यावर चंदगड आणि आजरा येथील कोरोना केअर सेंटरवर रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत.
यापूर्वीच आजरा, चंदगड तालुक्याच्या सीमेवर असलेल्या बेळगाव जिल्ह्यात कोरोनाचा कहर असल्याने या परिसरात पुरती नाकाबंदी करण्यात आली आहे. तिघांनाही अद्याप कोणाच्या संपर्कात आल्यामुळे लागण झाली हे स्पष्ट झालेले नाही.
या तिघांसह कोल्हापूरातील कोरोनाग्रस्तांची आत्तापर्यंत एकूण रुग्णांची संख्या 17 वर गेली आहे..त्यातील 9 जणांना डिस्चार्ज तर एक जण मयत झाला आहे.