CoronaVirus In Karnatka : कोरोना योध्यांना दिलेले लॉज केले खाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 17:32 IST2020-06-12T17:28:29+5:302020-06-12T17:32:29+5:30
कोरोनाविरुद्ध लढा देणाऱ्या सगळ्या खात्याच्या कर्मचाऱ्यांना सरकारने कोरोना वारियर्स म्हणून संबोधून त्यांचा गौरव केला होता. पण आरोग्य खात्याच्या महत्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या कोरोना वारियर्सना ते राहत असलेले लॉज खाली करून हातात लगेज घेऊन थांबायची वेळ आली आहे. शिवाय भोजनाची व्यवस्था तुमची तुम्ही करून घ्या असेही सांगण्यात आले आहे.

CoronaVirus In Karnatka : कोरोना योध्यांना दिलेले लॉज केले खाली
बेळगाव : कोरोनाविरुद्ध लढा देणाऱ्या सगळ्या खात्याच्या कर्मचाऱ्यांना सरकारने कोरोना वारियर्स म्हणून संबोधून त्यांचा गौरव केला होता. पण आरोग्य खात्याच्या महत्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या कोरोना वारियर्सना ते राहत असलेले लॉज खाली करून हातात लगेज घेऊन थांबायची वेळ आली आहे. शिवाय भोजनाची व्यवस्था तुमची तुम्ही करून घ्या असेही सांगण्यात आले आहे.
कोरोना रुग्णाची टेस्ट करणाऱ्या कर्मचाऱ्यांची दोन लॉजमध्ये राहण्याची सोय करण्यात आली होती. शिवाय नाश्ता, भोजनाची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली होती.पण शुक्रवारी अचानक त्यांना ते राहत असलेले लॉज खाली करून जिल्हा रुग्णालय आवारात असणाऱ्या ट्रेनिंग होस्टेलमध्ये शिफ्ट होण्यास सांगितले गेले. शिवाय जेवणाची व्यवस्था तुमची तुम्ही करून घ्या असेही सांगण्यात आले.
कोरोना रुग्णांची टेस्ट करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना अशा तऱ्हेची वागणूक देऊन त्यांचा अपमान केला आहे.हे कर्मचारी जिल्ह्यातील विविध तालुक्यातून आले असून कोरोना रुग्णांची टेस्ट करण्याचे, त्यांचे नमुने तपासण्याचे काम स्वतःचा जीव धोक्यात घालून करत आहेत. त्यामुळे एकीकडे कोरोना वारियर्स म्हणून गौरव करत असतानाच त्यांना अशी वागणूक देणे चुकीचे आहे असे मत व्यक्त होत आहे.